आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः बॉलिवूडमधील घनिष्ट मित्र म्हणून फिरोज खान आणि विनोद खन्ना यांचे नाव घेतले जायचे. दोघांचीही आज (27 एप्रिल) पुण्यतिथी आहे. फिरोज खान यांना या जगाचा निरोप घेऊन नऊ वर्षांचा काळ लोटला तर विनोद खन्ना यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 2009 मध्ये फिरोज खान यांचे निधन झाले होते, तर त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये याचदिवशी विनोद खन्ना यांची प्राणज्योत मालवली होती. दोघांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
कॅन्सरमुळेच झाले दोघांचे निधन...
फिरोज खान आणि विनोद खन्ना यांचे निधन कॅन्सरमुळे झाले. फिरोज यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता, तर विनोद खन्ना यांना ब्लॅडर कॅन्सर होता. 1976 मध्ये रिलीज झालेल्या 'शंकर शंभू'मध्ये फिरोज खान आणि विनोद खन्ना एकत्र झळकले होते. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती.
'कुर्बानी'च्या सेटवर झाली होती मैत्री..
1980च्या 'कुर्बानी'मध्ये दोघे एकत्र झळकले होते. या चित्रपटाचे फिरोज खान निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होत. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि ते एकदम जीवलग मित्र बनले. या चित्रपटात फिरोज खान आणि विनोद खन्ना यांच्यासह झीनत अमान, कादर खान, शक्ती कपूर आणि अरुणा इराणी हे कलाकार झळकला होते. चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने त्याकाळात बारा कोटींचा व्यवसाय केला होता..
संन्यास घेतल्यानंतर कमबॅकमध्ये फिरोज यांनी केली विनोद खन्नांना मदत..
'कुर्बानी' चित्रपटानंतर फिरोज विनोद यांना त्यांचा आगामी चित्रपट 'जांबाज'मध्ये घेण्यास उत्सुक होते. पण नंतर ही भूमिका अनिल कपूर यांनी केली. याचवेळी विनोद खन्ना ओशोंच्या आश्रमात निघून गेले आणि त्यांच्या आश्रमात माळीचे काम करु लागले. ओशोच्या आश्रमातून बाहेर आल्यानंतर विनोद यांना पु्न्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचे होते. तेव्हा फिरोज यांनी त्यांच्यासोबत 'द्यावान' चित्रपट साईन केला. चित्रपटातील माधुरी आणि विनोद यांच्या किसींग सीनची फार चर्चा झाली. हा चित्रपट फिरोज खान यांनी दिग्दर्शित केला होता.
पुढील स्लाईड्सवर, या चित्रपटांमध्ये झळकले होते फिरोज खान आणि विनोद खन्ना...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.