आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते विनोद खन्ना, वाचा मुंबईत कुठे आहेत अॅक्टर्सची घरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेते विनोद खन्ना यांची 27 एप्रिल रोजी पहिली पुण्यतिथी होती. 27 एप्रिल 2017 ब्लॅडर कॅन्सरमुळे विनोद खन्ना यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले होते. विनोद खन्ना यांचे साऊथ मुंबईतील मालाबार हिलस्थित IL Palazzo अपार्टमेंटमध्ये घर आहे.  या 21 मजली इमारतीच्या सी ब्लॉकमध्ये 13व्या मजल्यावर त्यांचे आलीशान घर आहे. त्यांच्या पश्च्यात या घरात आता त्यांच्या दुस-या पत्नी कविता, मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा वास्तव्याला आहे.  विनोद खन्ना यांचे पहिले लग्न 1971 साली गितांजली यांच्यासोबत झाले होते. विनोद आणि गितांजली यांना अक्षय आणि राहुल खन्ना ही दोन मुले आहेत. विनोद खन्ना यांनी 1990 मध्ये त्यांच्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान असलेल्या कवितासोबत दुसरे लग्न केले होते. 


याच अपार्टमेंटच्या दुस-या फ्लॅटसाठी विनोद खन्ना यांनी लावली होती रेकॉर्डब्रेक बोली...
- विनोद खन्ना यांचा IL Palazzo अपार्टमेंटशी खूप जिव्हाळा होता. 2008 मध्ये येथील एका फ्लॅटचा सिटीबँकेच्या वतीने लीलाव होत असताना विनोद खन्ना यांनी 31 कोटींची रेकॉर्डब्रेक बोली लावली होती. 
- विनोद खन्ना यांचे या अपार्टमेंटच्या सी ब्लॉकमध्ये एक फ्लॅट होता. लीलावात 31 कोटींची बोली लावून ते दुसरा फ्लॅट खरेदी करु इच्छित होते. पण काही कारणास्तव ही डील पूर्ण होऊ शकली नव्हती. नंतर 2012 मध्ये एका डायमंट मर्चंटने 28 कोटीत हा फ्लॅट खरेदी केला होता. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा मुंबईत कुठे वास्तव्याला आहेत बॉलिवूडचे दुसरे अॅक्टर्स...  

बातम्या आणखी आहेत...