आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर विनोद यांच्या घरी रेखाचे झाले होते चपलेने स्वागत, वाचा असेच किस्से

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये विविध अभिनेते आजवर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. अशाच काही अभिनेत्यांची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द मोठी नसली तरीही आपल्या छोट्या कारकिर्दीतही या कलाकारांनी त्यांची छाप सोडली आहे. असाच एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा. 13 फेब्रुवारी 1945 मध्ये अभिनेता विनोद मेहराचा जन्म झाला होता. 'रागनी' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं ज्यामध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्यही तितकेच वादग्रस्त घटनांनी ग्रासलेले होते. वैवाहिक आयुष्य आणि चित्रपट कारकिर्दीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे त्यांच्या आयुष्यावरही त्या सर्व घटनांचा परिणाम होत होता. ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेत्री रेखासोबतचे त्यांचे नाते सर्वांसमोर उघड झाल्यानंतर. त्यांच्या लग्नासंबंधीत एक किस्सा आहे. 

 

रेखाचे झाले होते चपलीने स्वागत
रेखाच्या ऑटोबायोग्राफीमध्ये तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. यामध्ये विनोद मेहरांसोबत लग्नानंतर करण्यात आलेले चपलेने स्वागत... हा किस्सा आहे. यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या 'रेखा : अनटोल्ड स्टोरी' या ऑटोबायोग्राफीत याविषयी सविस्तर सांगण्यात आले आहे. रेखा यांचे विनोद मेहरांसोबत लग्न झाले होते. कोलकातामध्ये लग्न झाल्यानंतर रेखा विनोद मेहरांसोबत त्यांच्या घरी आल्या, तर विनोद यांच्या मातोश्री कमला मेहरा यांनी रागाच्या भरात रेखावर चप्पल उगारली होती. रेखा कमला मेहरा यांच्या पाया पडायला गेली असता, त्यांनी तिला धक्का दिला आणि घराबाहेर जाण्यास सांगितले. रेखा घराच्या दारातच उभी होती. त्यावेळी तिच्या सासूबाई कमला मेहरांनी तिला शिवीगाळ केली. विनोद मेहरा यांनी मध्यस्थी करत आपल्या आईची समजूत घातली. भांडणामुळे रेखा दुःखी झाली. ती रडत लिफ्टच्या दिशने गेली. विनोद यांनी रेखाला तिच्या घरी परत जाण्यास सांगितले आणि ते मात्र स्वतः आपल्या आईसोबतच राहिले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा विनोद मेहरा यांच्या दूस-या पत्नीने विनोद यांना सोडून केले जेपी दत्तांसोबत पळून जाऊन केले लग्न...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...