आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे अनुष्का-विराटचे हटके वेडिंग रिसेप्शन कार्ड, आमंत्रणासोबत दिला खास संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीतील टस्कनी येथे 11 डिसेंबर रोजी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा थाटात विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर या दोघांचे कुटुंबीय आता भारतात परतले आहे. तर अनुष्का आणि विराट हनीमूनसाठी इटलीहून रोमला रवाना झाले. आठवडाभर हनीमून साजरा केल्यानंतर हे दोघे वेडिंग रिसेप्शनसाठी भारतात परतणार आहेत. येत्या 21 डिसेंबर आणि  26 डिसेंबर रोजी त्यांचे वेडिंग रिसेप्शन होणार आहे. 21 डिसेंबर रोजी दिल्लीत आणि 26 डिसेंबर रोजी मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

 

यापूर्वीच दोघांच्या दिल्लीतील रिसेप्शन पार्टीचे कार्ड समोर आले होते. आता त्यांच्या मुंबईत होणा-या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका समोर आली आहे. ही पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  त्याचे कारण म्हणजे या आमंत्रण पत्रिकेवर अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्याच अंदाजात एक खास संदेश दिला आहे.

 

दिग्दर्शक महेश भट यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही आमंत्रण पत्रिका पोस्ट करत विराट- अनुष्काला शुभेच्छा दिल्या. या पत्रिकेसोबतच एक रोपटे पाहायला मिळत आहे. हे रोपटे लावून पर्यावरण रक्षणाचा अनमोल संदेश दोघांनी पाहुण्यांना दिला आहे.  

 

विराट-अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनला सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, हरभजन सिंह, रोहित शर्मा, महेंद्र सिंह, आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खानसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'विरुष्का'च्या रिसेप्शन कार्डसह इतर काही खास फोटोज.. 

 

बातम्या आणखी आहेत...