आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांचे पहिले वेडिंग रिसेप्शन गुरुवारी रात्री दिल्लीत झाले. येथील ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह या पंचतारांकित हॉटेलच्या दरबार हॉलमध्ये हा सोहळा झाला. अनुष्का-विराटला शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी देखील आले होते. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे देखील नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. फंक्शन सुरु होण्यापूर्वी न्यूली मॅरिड कपलने मीडियासमोर येऊन फोटोसेशन केले.
पीएम मोदी जातीने उपस्थित
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातीने उपस्थित राहून अनुष्का-विराट यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींनी ग्रे कलरचा सफारी सूट घातलेला होता.
- नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले. अनुष्का-विराटसोबत त्यांच्या नातेवाईकांचीही मोदींनी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.
- रिसेप्शनमध्ये विराटने ब्लॅक कलरची शेरवाणी घातली होती तर अनुष्का रेड-गोल्डन कलर बनारसी साडीमध्ये सुंदर दिसत होती.
अनुष्का-विराटने स्वतः दिले होते निमंत्रण
- न्यूली कपलने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. यावेळी विराटचा मोठा भाऊ विकास देखील उपस्थित होता.
दिल्लीनंतर मुंबईत होणार रिसेप्शन
- दिल्लीनंतर मुंबईमध्ये दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये बॉलिवूड आणि क्रिकेटर सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
- मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनला सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, हरभजन सिंह, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बॉलिवूडचे अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी सहभागी होऊ शकतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राजकीय व्यक्तमत्वापासून बॉलिवूड हस्तींपर्यंतच्या दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.