आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्काची लगीन घाई... दिल्लीतील रिसेप्शननंतर मुंबईसाठी झाले रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सेलिब्रिटी कपल झालेले अनुष्का-विराट कोहली यांच्यावर आता प्रत्येक क्षणी मीडियाच्या कॅमेरांची नजर असते. अनुष्का-विराट यांचे गुरुवारी दिल्लीत ग्रँड वेडिंग रिसेप्शन झाल्यानंतर हे नवविवाहित जोडपे शुक्रवारी मुंबईला रवाना झाले आहे. अनुष्का आणि विराट दिल्ली विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी अनुष्का व्हाइट फ्लोरल गाऊनध्ये होती. तर विराट ब्लॅक टीशर्ट आणि ट्राऊजरमध्ये होता. यावेळी त्यांच्यासोब दुसरे कोणी फॅमिली मेंबर्स नव्हते.

 

- दिल्लीतील ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह येथे 21 डिसेंबरला विराट-अनुष्काचे ग्रँड रिसेप्शन झाले. पंतप्रधान मोदींपासून क्रिकेटचे अनेक दिग्गज या रिसेप्शनला पोहोचले होते. 
- या सेलिब्रिटी कपलचे दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबरला मुंबईत होऊ घातले आहे. त्यासाठी दोघे शुक्रवारी मुंबईला जाण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. 

 

रिसेप्शनमध्ये शिखर धवनसोबत थिरकले विराट-अनुष्का 
- दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
- पंजाबी सिंगर गुरदास मान यांनीही विराट-अनुष्काला आशीर्वाद दिला. यावेळी गुरदास मान यांनी पंजाबी गाण्यावर डान्सही केला. 
- अनुष्का - विराटनेही क्रिकेटर शिखर धवनसोबत ठुमके लगावले. 

 

आता मुंबईत रिसेप्शन... 
- इटलीत 11 डिसेंबरला लग्न झाल्यानंतर हे कपल हनीमूनसाठी रोमला गेले होते. 
- विराट-अनुष्काने भारतात दोन रिसेप्शन आयोजित केले, त्यातील पहिले रिसेप्शन 21 डिसेंबरला दिल्लीत झाले. आता दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत होईल. येथे बॉलिवूड आणि क्रिकेट वर्ल्डचे दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. 
- मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनला सचिन तेंडुलकर,  युवराज सिंह, हरभजन सिंह, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बॉलिवूडचे अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी सहभागी होऊ शकतात.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, एअरपोर्टवर विराट करत राहिला पत्नीला प्रोटेक्ट... 

बातम्या आणखी आहेत...