आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wadali Brothers Life Unknowns Facts: Legendary Sufi Singer Payrelal Wadali Passes Away

5 Facts: एकेकाळी रिजेक्ट झाला होता आवाज, वडाली ब्रदर्सनी अशी निर्माण केली ओळख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सूफी गायक प्यारेलाल वडाली (66) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्यारेलाल त्यांचे थोरले बंधू पूरनचंद वडाली यांच्यासोबत मिळून गाणी गायचे. या दोघांच्या जोडीने जगभरात सुफी गायनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, वडाली ब्रदर्स यांच्याशी निगडीत 5 खास गोष्टी...


जेव्हा संगीत संमेलनात मिळाली नव्हती गायनाची परवानगी...
- सूफी सिंगर वडाली ब्रदर्स अमृतसरच्या 'गुरू की वडाली' या गावातून आहेत. हे ठिकाण धन-धन श्री गुरू हरगोविंद साहब (शिखांचे 6वे गुरू) यांचे जन्मस्थान आहे.
- संगीतकार घराण्यातील पाचव्या पिढीत जन्मलेले पूरनचंद आणि प्यारेलाल यांनी सुफी संतांचा महिमा गाण्यातून सादर केला.
- वडाली ब्रदर्स पहिल्यांदा गावाबाहेर जालंधरच्या हरबल्लभ मंदिरात सादरीकरणासाठी गेले होते. मात्र हरबल्लभ संगीत संमेलनात (जालंधर) दोघे त्यांच्या आवाजामुळे रिजेक्ट झाले होते. त्यांना तेथे गायनाची परवानगी नाकारण्यात आली होती.
- या अपयशानंतर वडाली ब्रदर्सनी जालंधरमध्ये संगीत संमेलन ठेवले होते. ऑल इंडिया रेडिओच्या एका एग्झिक्यूटिव्हने त्यांना बघितले आणि दोघांना पहिले गाणे रेकॉर्ड करण्याची संधी दिली होती.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पैसे कमावण्यासाठी कोणते काम करायचे प्यारेलाल, यासह वाचा वडाली ब्रदर्सशी निगडीत 4 Facts...

बातम्या आणखी आहेत...