आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माया 2\'च्या नवीन गाण्याच चक्क लिपलॉक करताना दिसल्या या अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'माया 2' या वेब सीरिजचा नवीन ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला होता. आता गुरुवारी  'माया 2'मधील नवीन गणे 'जी चाहता है..' हे रिलीज करण्यात आले. या गाण्यात वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेत्री लीना जुमानी आणि प्रियल गौर चक्क लिपलॉक करताना दिसल्या आहेत.  'माया 2'ची कथा सिम्मी आणि रुही या दोन लेस्बियन महिलांभोवती गुंफण्यात आली आहे. रुहीच्या भूमिकेत लीना तर सिम्मीच्या भूमिकेत प्रियल आहेत. सिम्मी ती लेस्बियन असल्याचे जगापासून लपवून ठेवते आणि एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये येते. पण जेव्हा सिम्मीच्या आयुष्यात रुहीची एन्ट्री होते, तेव्हा दोघीही जगाची पर्वा न करता आपल्या इच्छा पुर्ण करतात. रिलीज झालेल्या या गाण्यात दोघी एकमेकींना किस करतानाही दिसल्या आहेत.  ही वेब सीरिज 30 मे पासून सुरु होत आहे. विक्रम भट यांची मुलगी कृष्णा भट हिने 'माया 2'चे दिग्दर्शन केले आहे. 

 

पुढील स्लाईडवर बघा, गाण्याचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...