आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wedding Ceremony: Shweta Tripathi Bachelorette Bash Gets And Fiance Chaitnya Sharma

PHOTOS :29 जूनला होणार बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचे लग्न, मेंदी सेरेमनीचे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'मसान', 'हरामखोर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी 29 जूनला लग्न करणार आहे. ती बॉयफ्रेंड आणि अॅक्टर-रॅपर चैतन्य शर्मासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहेत. आज तिची मेंदी सेरेमनी पार पडली. सोमवारी श्वेताची बॅचलरेट पार्टी झाली. यामध्ये तिने फ्रेंड्ससोबत एन्जॉय केला. फक्त मुलींसाठी झालेल्या या पार्टीमध्ये श्वेताला सप्राइज देण्यासाठी चैतन्यही पोहोचला. चैतन्यने इंस्टाग्रामवर बॅचलरेट पार्टीचे फोटोज शेअर केले आहेत. चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. चैतन्य म्हणतो की, 32 वर्षांची श्वेता खुप तरुण दिसते.


चैतन्यने श्वेताला असे केले प्रपोज...
चैतन्यने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, "आम्ही दोघं मुंबई अॅक्टिंग वर्ल्डमध्ये काम करण्यासाठी आलो होतो. येथेच आमची भेट झाली. यानंतर एका कॉन्सर्ट दरम्यान आमची दिल्लीमध्ये भेट झाली."
- चैतन्यने पुढे सांगितले की, "दिल्लीमधून परत येताना आमचे सीट एकमेकांसमोर होते. सकाळी 5 वाजले होते आणि प्लेन लँड होणार होते. तेव्हा आमचे बोलणे सुरु झाले आणि नंबर एक्सचेंज झाले."
- प्रपोजलविषयी श्वेता म्हणाली होती की, "चैतन्यने मला खुप रोमँटिक पध्दतीने प्रपोज केले होते. त्याने मुंबईच्या 'कुक्कू क्लब'मध्ये मला प्रपोज केले होते. हा मुंबईचा एक परपॉर्मिंग फ्लेस आहे. त्याने मला सांगितले की, त्याचा एक नवीन प्ले आहे. मी तिथे गेल्यानंतर त्याने मला प्रपोज केले."


गोव्यामध्ये होणार डेस्टिनेशन वेडिंग
- श्वेता आणि चैतन्यचे लग्न गोव्यामध्ये होणार आहे. 27 जूनला कपलची मेंदी झाली. तर 30 ला पूल पार्टी होईल. या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होतील.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, दिल्लीचे माजी चीफ सेक्रेटरी पी. के. त्रिपाठी यांच्या मुलीला बॉलिवूड अॅक्ट्रेस बनायचे नव्हते.
- तिला थिएटर आवडायचे, परंतू ती चित्रपटांपर्यंत पोहोचली. तिने डिज्नी चॅनलचा शो 'क्या मस्त है लाइफ' शॉर्फ फिल्म आणि काही टीव्ही कमर्शिअरमध्येही काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...