आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुष्मिता सेनचा हैराण करणारा खुलासा, 15 वर्षांच्या मुलाने गर्दीत केले गैरवर्तन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने शनिवारी रात्री एका इव्हेंटमध्ये हैराण करणारा खुलासा केला. मुंबईमध्ये एका मॉलमध्ये आयोजिक 'मेक योर सिटी सेफ' या इव्हेंटमध्ये वुमन सेफ्टीविषयी बोलताना सुष्मिताने सांगितले की, 6 महिन्यांपुर्वी एका 15 वर्षांच्या मुलाने फंक्शनमध्ये तिच्यासोबत छेडछाड केली होती. सुष्मितानुसार, अनेक वेळा लोक विचार करतात की, आमच्याकडे बॉडीगार्ड्स आहेत. तर आम्हाला कुणी छेडणार नाही. परंतू सत्य तसे नसते. 

 

गर्दीचा फायदा उचलत त्याने मला स्पर्श केला तर मी त्याला पकडले
आपल्यासोबत 6 महिन्यांपुर्वी झालेली घटना सांगत सुष्मिताने सांगितले की, एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान 15 वर्षांच्या मुलाने माझ्यासोबत मिसबिहैव केला. त्याला वाटले की, आजुबाजूला गर्दी आहे तर मला हे कळणार नाही. परंतू तो चुकीचा होता. मी मागून त्याचा हात पकडला. त्याचे वय फक्त 15 होते हे पाहून मी शॉक्ड होते.

 

त्याचा गळा पकडून मी त्याला लांब नेऊन समजावले
यानंतर मी त्याची मान पकडली आणि दूर जाऊन सांगितले की, जर मी ओरडून लोकांना सांगितले तर तुझे आयुष्य नष्ट होईल. त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले हे मान्य करण्यासाठी तो पहिले तयारच नव्हता. पण मी जेव्हा त्याला फोर्स केला तेव्हा त्याने आपली चुक कबूल केली. तो सॉरी बोलत म्हणाला की - आता मी अशी चूक कधीच करणार नाही. मीसुध्दा त्यामुलाविरुध्द काहीच अॅक्शन घेतली नाही. कारण तो फक्त 15 वर्षांचा होता. त्याला शिकवण्यात आलेले नाही की, असे करणे पाप आहे, मनोरंजन नाही. 


रेपसाठी फाशी व्हावी
सुष्मिताने त्या मुलाला माफ केले. परंतू महिलांवर होणा-या अत्याचाराविषयी ती खुप गंभीर आहे. सुष्मिताने बलात्कार करणा-यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. सुष्मिता म्हणाली - "जेव्हा मॅज्योर लोग रेप करतात तेव्हा त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी."

 

बातम्या आणखी आहेत...