आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 च्या दंगलीमध्ये आमिरने सुनील दत्त यांच्यासोबत रस्त्यांवर काढली होती रात्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आमिर खान म्हणतो की, 1993 मध्ये जेव्हा मुंबईमध्ये दंगल झाली, तेव्हा त्याने सुनील दत्त यांच्यासोबत रस्त्यावर रात्र काढली होती. सुनील दत्त यांची आठवण काढत त्याने हे शेअर केले. आमिर म्हणतो की, "1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटांवेळी बॉलिवूडमधून एक प्रतिनिधी मंडळ मुंख्यमंत्र्याजवळ पाठवण्यात आले   होता. सेना बोलवावी लागली किंवा कोणतेही पाऊल उचलावे लागले तरी हल्ले थांबायला हवेत हे सांगण्यासाठी यांना पाठवण्यात आले होते."


मंत्रालयातील गांधी प्रतिमेजवळ काढली होती संपुर्ण रात्र
- आमिर खान म्हणाला की, "आम्ही सर्वांनी ठरवले होते की, मंत्रालयातील गांधी प्रतिमेजवळ बसून प्रदर्शन करु. जोपर्यंत दंगल थांबत नाही तोपर्यंत प्रदर्शन सुरु ठेवायचे होते. माझ्यासोबतच सुनील दत्त साहेब, यश चोप्रा, जॉनी वॉकर आणि अनेक प्रोड्यूसर्सही त्या रात्री उपस्थित होते."

 

किस्से ऐकत काढली संपुर्ण रात्र
- आमिरनुसार, संपुर्ण रात्र दत्त साहेब, यश चोप्रा आणि जॉन वॉकर यांच्या करिअर संबंधीत किस्से ऐकत ऐकत गेली. त्याने सांगितले की, पुढच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आणि वातावरण पहिल्यासारखे झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...