आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

India मध्ये परतण्याविषयी बोलला इरफान खान, दिले असे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इरफान खान सध्या आजारपणात आहे. इरफान गेल्या चार महिन्यांपासून लंडनमध्ये गंभीर आजार न्योरोइंडोक्राइन कँसरवर उपचार घेत आहे. तो सध्या फिल्म जगतापासून दूर आहे. मार्च महिन्यात त्याच्या आजाराचे निदान झाले. त्याला 'न्यूरोएंडोक्राइन' आजार आहे. काही दिवसांपुर्वी इरफानने लंडनमधून एक लेटर लिहून आपली परिस्थीती सांगितली होती. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, पण तो निश्चित कधी बरा होणार याची काही माहिती मिळालेली नाही. 

 

कधी येणार? यावर असे बोलला इरफान
इरफान भारतात कधी परतणार याविषयी वृत्त आहे. 'डेक्कन क्रॉनिकल'ने दिलेल्या वृत्तानुसार, मी कधी परतणार हे मला माहिती नसल्याचं इरफाननं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या गोष्टी कधीपर्यंत ठीक होतील याचं उत्तर शोधण्याच्या घाईत मी नाही असंही तो म्हणाला.

 

दोन चित्रपटांमध्ये दिसणार इरफान
- मार्चमध्ये इरफानने आपल्या आजाराचा खुलासा केला होता. त्यानंतर त्याचा 'ब्लॅकमेल' चित्रपट रिलीज झाला होता. इरफानच्या आगामी 'कारवाँ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्याचं मार्केटिंग आणि प्रमोशन निर्मात्यांना बहुतेक इरफानच्या अनुपस्थितीतच करावं लागणार आहे.  
- यानंतर इरफानचे कारवां आणि पजल चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहेत. आजारपणामुळे त्याचा विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटाची शूटिंग पुर्ण होऊ शकलेली नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोणला कास्ट करण्यात आले होते. परंतू इरफान बरा होऊपर्यंत हा चित्रपट टाळण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...