आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवीनने उघडला होता संजय दत्तविरोधात मोर्चा, म्हणाली होती - माझ्याजवळ आहेत पुरावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय दत्तचा बायोपिक असलेल्या 'संजू' या चित्रपटात 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटांचा उल्लेख आहे. याप्रकरणी संजय दत्तला अवैधरित्या AK-56 बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. शिवाय तो याच प्रकरणात 18 महिने तुरुंगातही राहिला होता. त्याकाळात अनेक सेलिब्रिटी संजय दत्तच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना करत होते, अनेकांनी तो निर्दोष असल्याचेही म्हटले होते. पण एक अभिनेत्री अशी होती, जिने संजयच्या विरोधातच मोर्चा उघडला होता. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री परवीन बाबी हिच्याविषयी. 


2002 मध्ये परवीनने केला होता दावा... 
- 29 जुलै 2002 रोजी टाडा कोर्टाशी निगडीत सुत्रांनी खुलासा केला होता, की परवीन बाबीजवळ संजय दत्तच्या विरोधात काही सबळ पुरावे होते. परवीनने न्यायाधीश पी. डी. कोडे यांना लिहिले होते की, तिच्याजवळ 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणी संजय दत्तविरोधात अनेक पुरावे आहेत.  5 ऑगस्ट 2002 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तात न्यायाधीश कोडे यांनी परवीनला तिच्याकडे असलेले पुरावे मागितल्याचा उल्लेख होता. त्यानंतर 8 ऑगस्ट 2002 रोजी परवीनने कोडे यांना कळवले होते की, तिला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे तिच्याजवळ पुराव्याच्या रुपात असलेले 33 पानांचे एफिडेविट घेऊन ती न्यायालयात पोहचू शकत नाही. 

 

परवीनने केली होती आयुक्तांना नियुक्त करण्याची अपील..
- परवीनने कोडे यांना निवेदन केले होते, की त्यांनी आयुक्तांची नियुक्ती करुन तिच्याजवळ असलेले पुरावे तिच्या घरुन न्यावे. त्यानंतर न्यायाधीशांनी 19 ऑगस्ट 2002 ही तारीख देऊन सीबीआयला याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि सोबतच संजय दत्तलादेखील लिखित रुपात त्याची बाजू मांडायला सांगितली होती. पण 19 ऑगस्टच्या सुनावणीत परवीनची याचिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा दावा मीडियात केला होता. पण त्यानंतर परवीन खरंच सुप्रीम कोर्टात गेली होती की नाही याविषयीची माहिती समोर आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...