आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग खुलासा: सकाळी उठल्यानंतर हेरोईन शोधायचा संजय दत्त, दारुने धूत होता तोंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्त. (फाइल फोटो) - Divya Marathi
संजय दत्त. (फाइल फोटो)

मुंबई - फिल्म प्रोड्यूसर आणि डायरेक्टर महेश भट्टने संजय दत्त बद्दल एक शॉकिंग खुलासा केला आहे. भट्टने ट्विटरवर लिहिले आहे,'संजय दत्तल ड्रग्जच्या विळख्यात असा अडकला होता की एक काळ असा होता की रोज सकाळी उठल्यानंतर हेरोईन कुठे मिळेल याचा तो शोध घ्यायचा. ड्रग्ड अॅडिक्शन हा संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.' एवढेच नाही, महेश भट्टने या ट्विटसोबत ऑडियोही शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की संजय दत्त दारुने तोंड धुत होता. त्या काळात दारु ही त्याला माऊथवॉश सारखी वाटायची. 

 

संजय दत्तने ट्राय केले प्रत्येक प्रकारचे ड्रग्ज 
- संजय दत्तनेही त्याच्या व्यसानाधिन दिवसांबद्दल अनेकदा भाष्य केले आहे. सप्टेंबर 2017 मध्ये जयपूर येथील एका कार्यक्रमात संजय दत्तने त्या दिवसांच्या कटू आठणींना उजाळा दिला होता. 
- संजय दत्त म्हणाला होता, 'एकदा ड्रग्जची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे. मी दिवसातील 23-23 तास एखाद्या उंदीराप्रमाणे बाथरुममध्येच पडून असायचो. आता त्या दिवसांचा विचार केला तर वाटते की मी आयुष्यातील ते सोनेरी दिवस ड्रग्जमध्ये वाया घालवले.'
- संजय दत्तने सांगितले, 'असे कोणतेही ड्रग्ज नव्हते जे मी ट्राय केले नसेल. अमेरिकेतील रिहॅब सेंटरमध्ये जेव्हा डॉक्टरने ड्रग्जची लिस्ट दिली तेव्हा मी प्रत्येकावर टिक केले होते. मात्र जेव्हा ट्रिटमेंट घेतली, त्यानंतर वाटले की माझ्याजवळ माझे कुटुंब आहे तेव्हा ड्रग्जला जवळ करण्याची काय गरज आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, एक किलो ड्रग्ज घेऊन केलाय संजय दत्तने प्रवास... 

बातम्या आणखी आहेत...