आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेसने सुरु केली फॅमिली प्लॅनिंग, BF ला सोडून बिझनेसमॅनसोबत केले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L) एक्स बॉयफ्रेंड एजाज खानसोबत अनिता हसनंदानी, पती रोहित रेड्डीसोबत अनिता. - Divya Marathi
(L) एक्स बॉयफ्रेंड एजाज खानसोबत अनिता हसनंदानी, पती रोहित रेड्डीसोबत अनिता.

 मुंबई - टीव्ही शो 'ये है मोहब्बते' फेम अनिता हसनंदानीबद्दल असे कयास लावले जात आहे, की ती सध्या प्रेग्नेंट आहे. त्याचे कारण तिचे वाढलेले वजन आहे. नुकेतच गोव्यात कॉमेडियन भारती सिंहच्या लग्नात अनिता आली होती. तेव्हा तिच्या न्यू लूक्सला पाहून अशा बातम्या येत आहेत की तिने फॅमिली प्लॅनिंगला सुरुवात केली आहे. वास्तविक या बातम्यांबद्दल अनिताने अद्याप काहीही म्हटलेले नाही. 

 

2013 मध्ये केले होते बिझनेसमॅनसोबत लग्न... 
- अनिता आणि रोहित एकाच जिममध्ये वर्कआऊट करायचे. दोघांमध्ये मैत्री झाली आणि या जोडीने एकत्र पब्ज, पार्टीला जाण्यास सुरुवात केली. 
- काही काळानंतरच त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि अनिताने 14 ऑक्टोबर 2013 ला तेलुगु बॉयफ्रेंड रोहित रेड्डीसोबत विवाह केला. 
- रोहित एक बिझनेसमॅन असून त्याचा व्यापार गोव्यामध्ये पसरलेला आहे.

 

आधी टीव्ही अॅक्टरला डेट करत होती अनिता 
- अनिता (36) रोहितच्या आधी 6 वर्षे मोठ्या टीव्ही अॅक्टर एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 
- दोघांचे 2010 मध्ये ब्रेकअप झाले. त्याचे कारण एजाजची कॅनेडियन सिंगर नताली डीसोबत वाढती जवळीत होती. 

 

या शोजमध्ये केले अनिताने काम 
- अनिताने आतापर्यंत 'काव्यांजली', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से' आणि 'ये है मोहब्बते' सारख्या शोजमध्ये काम केले आहे. 
- शोजशिवाय तिने 'बंधन', 'ताल', 'कुछ तो है', 'ये दिल', 'कृष्णा कॉटेज', 'रागिनी एमएमएस 2' आणि 'हीरो' सारख्या फिल्ममध्ये काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अनिता-रोहितचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...