आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री शम्मी अनंतात विलीन, वहिदा रहमानसह या कलाकारांनी दिला अखेरचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील लोखंडवाला स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वहिदा रहमान, फरीदा जलाल, बोमन इराणी, फराह खान, सुशांत सिंग, प्रिया दत्त, अंजू महेंद्रू यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.  

 

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री शम्मी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. प्रसिध्द फॅशन डिझायनर संदीप खोसला यांनी सोशल अकाउंटवरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असेल्या  शम्मी यांनी जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये 'कुली नं. 1', 'हम', 'गोपी किशन', 'हम साथ साथ है' या हिट चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांसोबतच टीव्हीवर त्यांनी काम केले होते.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, शम्मी यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...