आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Zaira Wasim Alleged Molester Arrested Now His Wife Called It All Publicity Stunt

पतीला अटक होताच पत्नी म्हणाली - पब्लिसिटी स्टंट आहे झायराचे छेडछाड प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दंगल फिल्मची अॅक्ट्रेस झायर वसीम (17) सोबत विस्तारा एअरलाइन्सच्या दिल्ली-मुंबई प्रवासात छेडछाडीची घटना घडली होती. आरोपीला रविवारी अटक झाली आहे. आरोपीचे नाव विकास सचदेव (39) आहे. झायराने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती इंस्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली होती. त्यानंतर विकासविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आणि कलम 354 आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारी त्याला कोर्टात हजर केले जाईल. 

 

आरोपीच्या पत्नीने झायरावर केला पब्लिसिटी स्टंटचा आरोप... 
- विकास सचदेवला रविवारी रात्री अटक झाली आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी दिव्या सचदेवने पतीला वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 
- दिव्याचे म्हणणे आहे, की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. झायराने फेमसाठी हे सर्व केले असून त्यामध्ये माझ्या पतीला गोवले आहे. 
- दिव्याने सांगितल्यानुसार, तिचा पती विकास दिल्लीहून मुंबईला घरी येत होता. आमच्या मामांचे निधन झाले होते, त्यामुळेही तो थोडा डिस्टर्ब होता. त्याने फ्लाइटमध्ये झोपण्यासाठी पांघरून मागितले होते. 
- दिव्याने म्हणाली, 'झायराच्या आरोपांने मला धक्का बसला आहे. तिच्या आरोपानंतर रविवारी माझ्या पतीला अटकही झाली आहे.'
- 'मला एक प्रश्न पडला आहे, की झायराने अलार्म का वाजवला नाही? 2 तासानंतर तिला आरडा-ओरड करण्याचे कसे सुचले? तिच्यासोबत तेव्हा तिची आई देखील तिथे होती. असे असताना तिने तेव्हाच आरडा-ओरड का केली नाही.'
- दिव्याने सांगितले, की माझे वडील एक्स आर्मी ऑफिसर आणि सासरे एक्स इनकम टॅक्स ऑफिसर होते. कोणाचा कसा सन्मान केला पाहिजे हे आम्हाला चांगले माहित आहे. आम्हाला 9 वर्षांचा एक मुलगा आहे. आम्ही त्याला देखील मिसबिहेव न करण्याचे शिक्षण देत असतो. 

बातम्या आणखी आहेत...