आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काबिल', 'रईस' च्या अभिनेत्याची प्रेयर मीट, पोहोचले नाही बॉलिवूडचे मोठे स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्टर नरेंद्र झा यांचे 14 मार्चला हार्ट अटॅकने निधन झाले होते. नुकतेच त्यांच्या प्रेयर मीटचे आयोजन करण्यात आले. इस्कॉन मंदिरात या प्रेयर मीटचे आयोजन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडचा कोणताच मोठा स्टार यावेळी उपस्थित नव्हता. प्रेयर मीटमध्ये सिंशांत सिंह, केक मेनन, निवेदिता भट्टाचार्य, आशुतोष गोवारिकर, श्वेता कवत्रा, मानव गोहिल, रमेश तोरानी, मोहित रैना, अनूप सोनी,  मिथिलेश चतुर्वेदी, व्रजेश हीरजी, हर्ष छाया, अमित बहल, विभा छिब्बर, शालिनी कपूर, रोहित सागरसोबत अनेक सेलेब्स सहभागी झाले. 


नरेंद्रने मॉडलिंगमधून केली होती करीअरची सुरुवात
नरेंद्रने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात 1992 मध्ये केली होती. दिल्लीमध्ये अँक्टिंग कोर्स केल्यानंतर तो मुंबईत आला. येथे मॉडलिंग केल्यानंतर अनेक जाहिरातीत काम केले. त्याने शाहिद कपूरच्या 'हैदर', शाहरुख खानच्या 'रईस', सनी देओलच्या 'घायल वन्स अगेन' सोबतच 'हमारी अधूरी कहानी', 'फोर्स-2', 'काबिल' सारख्या चित्रपटात काम केले. तो श्याम बेनेगलचा चित्रपट  'नेताजी सुभाष चंद्र बोस' यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसला होता. यासोबतच 'संविधान' मध्ये त्याने मोहम्मद अली जिन्नाची भूमिका साकारली आहे. नरेंद्र सध्या सलमान खान आणि बॉबी देओल स्टारर चित्रपट  'रेस-3' चित्रपटात काम करत होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रेअर मीटमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...