आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडच्या एका अॅक्ट्रेसच्या पणजोबांनी केले ह्यांचे डिझाईन, जाणून घ्या तिच्याबद्दल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरटेन्मेंट डेस्क-  डायरेक्टर जोया अख्तर यांच्या 'गली बाॅय' या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची भूमिका आहे पण कल्की कोचलिन देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे शुटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे पण फेब्रुवारी 2019 मध्ये रिलीज होणार आहे. कल्कीच्या बाबतीत फारच कमी लोकांना माहिती असेल की तिचे पणजोबा माॅरिस कोचलिन यांनी स्टेच्यू आॅफ लिबर्टी आणि आयफेल टाॅवरचे डिझाईन बनवले होते. कल्कीने 2009 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'देव डी' या चित्रपटातून आपल्या अभिनयातील करिअरची सुरवात केली. तिने बाॅलिवुडच्या अनेक चित्रपटात काम केले पण ती आपली विशेष ओळख तयार करु शकली नाही. अनुराग कश्यपशी केले होते लग्न......

 

कल्की कोचलिनने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी 2011 मध्ये लग्न केले होते. दोघांची ओळख देव डी च्या शुटिंगच्या वेळी झाली. दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नानंतर दोघे दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2013 मध्ये वेगळे झाले. तर 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. कल्कीला सिनेमाशिवाय नाटकातही काम करायला आवडते. कल्कीने 'शैतान' (2011), 'जिंदगी ना मिलेगी' 'दोबारा' (2011), 'शिंघाई' (2012), 'एक थी डायन' (2013), 'ये जवानी है दीवानी' (2013), 'काश' (2015), 'रिबन' (2017) या शिवाय अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...