आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांची जोधपुरमध्ये शूटिंगवेळी प्रकृती बिघडली, डॉक्टरांची टीम रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे- अमिताभ बच्चन यांचे फाइल छायाचित्र, उजवीकडे - ठग्स ऑफ हिंदूस्तान चित्रपटातील अमिताभ यांचा लूक. - Divya Marathi
डावीकडे- अमिताभ बच्चन यांचे फाइल छायाचित्र, उजवीकडे - ठग्स ऑफ हिंदूस्तान चित्रपटातील अमिताभ यांचा लूक.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. बिग बी सध्या जोधपूरमध्ये असून येथेच त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, उपचारांसाठी डॉक्टरांची टीम मुंबईहून जोधपूरसाठी रवाना झाली आहे. मात्र त्यांना नेमके  काय झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


5 मार्चपासून जोधपूरमध्ये आहेत बिग बी...
विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित आगामी 'ठग्स ऑफ हिंदूस्तान' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिग बी 5 मार्च रोजी जोधपूर येथे पोहोचले. येथे ते आमिर खानसोबत या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. जोधपूर येथील मेहरानगड येथे चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. शूटिंगदरम्यान त्यांना त्रास जाणवू लागल्याने सध्या शूटिंग थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. 


यशराज बॅनरचा बिग बजेट चित्रपट...
'ठग्स ऑफ हिंदूस्तान' हा 18 व्या शतकातील कथानकावर बेतलेला चित्रपट आहे. यशराज फिल्म्सचा हा बिग बजेट चित्रपट आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील शूटिंग सेटवरची बिग बी आणि आमिर खान यांची काही छायाचित्रे समोर आली होती. या चित्रपटात आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे अशा ठगांच्या भूमिकेत आहे ज्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, दोन दिवसांपूर्वी शूटिंग सेटवरील समोर आलेली काही छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...