आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे खरंच अमिताभ बच्चन आहेत? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अमिताभ बच्चन यांची तब्येत खराब असल्याच्या बातम्या नुकत्याच आल्या होत्या. यानंतर आता त्यांचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील एक फोटो झपाट्याने व्हायरल होतोय. सेटवरुन अमिताभ यांचा समोर आलेला लूक हैरान करणारा आहे. परंतू आता या व्हायरल फोटोचे सत्य समोर आलेय. खरेतर हा व्हायरल होत असलेला फोटो अमिताभ यांचा नाही. 


या व्यक्तीचा आहे फोटो
बिग बींच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटो अफगानी रिफ्यूजी शाहबसचा पोट्रेट आहे. हा फोटो फोटोग्राफर स्टीव्ह मॅककर्रीने जानेवारी 2017 मध्ये क्लिक केला. हा फोटो स्टीवने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या फोटो त्यांनी कॅप्शन देत लिहिले की,  'I made this portrait of Shabuz, age 68, an Afghan refugee in Pakistan. Many Afghans use only one name'. 


- मंगळवारी अमिताभ यांच्या आजाराच्या बातम्या आल्या होत्या. डॉक्टर्सची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जोधपूरला रवाना झाली होती. उपचारानंतर त्यांनी शूटिंगला सुरुवात केली. 
- काल रात्री त्यांनी एका ट्वीट केले, "कुछ कष्ट बढ़ा चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा, इलाज प्रबल, स्वस्थ हुए नवल, चलो इसी बहाने, अपनों का पता तो चला ab"
- जोधपूरमध्ये सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या त्यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. येथे अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमिर खान शूटिंग करत आहेत. यशराज बॅनरच्या या चित्रपटात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटासंबंधीत काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...