आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटानंतर सिंगल आहे 'बाबूजी जरा...' ची अभिनेत्री, राहिली आहे ओशोंच्या आश्रमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये ज्यावेळी चांगल्या आयटम नंबर्सचा विषय निघतो, तेव्हा दम चित्रपटातील  'बाबूजी जरा धीरे चलो...बिजली खड़ी यहां बिजली खड़ी, नैनों में चिंगारियां...गोरा बदन शोलों की लड़ी' या गाण्याची आठवण अवश्य होते. हे गाणे रिलीज होऊन 15 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे आयटम याना गुप्ताने गाण्यात म्हशीवर बसून एंट्री घेतली होती. तिचा डान्स जबरदस्त हिट ठरला. परंतू एका रात्रीत प्रसिध्दी मिळवणारी ही अभिनेत्री इंडस्ट्रीमधून अचानक गायब झाली. एवढ्या वर्षांमध्ये तिचा लूक खुप बदलला आहे.


ओशोच्या आश्रमामध्ये राहिली आहे याना...
23 एप्रिल 1979 ला चेकोस्लोवाकियाच्या बर्नोमध्ये जन्मलेल्या यानाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने वयाच्या 16 व्या वर्षापासून शॉर्ट फिल्म्स, मॉडलिंग आणि जाहिराती करणे सुरु केले आणि ती जापानला आली.
- ती लॅक्मेची ब्रांड एम्बेसडर होती. यासोबतच काल्विन क्लेन, विक्टोरिया सीक्रेट आणि किंगफिशच्या सर्वात प्रसिध्द मॉडल्सपैकी एक आहे. तिला खरी ओळख 'बाबूजी जरा धीरे चलो' गाण्यातून मिळाली.
- मॉडलिंगनंतर याना मुंबईमध्ये आली. येथील सुरुवातीच्या दिवसात ती पुण्यातील ओशोच्या आश्रमात राहिली.

- याना भारतात कलाकार सत्यमान गुप्ता यांच्या प्रेमात पडली.
- 2001 मध्ये यानाने सत्यकाम गुप्तासोबत लग्न केले आणि आपल्या नावापुढे गुप्ता जोडले. परंतू हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. 2005 मध्ये हे दोघं वेगळे झाले.
कॉन्टोवर्सीमध्ये अडकली याना
- याना एका इव्हेंटमध्ये विना पँटीचीच गेली होती. या गोष्टीमुळे खुप चर्चा झाल्या आणि ती कॉन्टोवर्सीत अडकली.
- ती एका चॅरिटी इव्हेंटमध्ये शॉर्ट ब्लॅक ड्रेस घालून गेली होती. यावेळी ती इंडरगारमेंट्स घालणे विसरली.
- यानंतर यानाने सफाई देताना सांगितले की, असे घाईघाईत झाले. परंतू लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगितले.
- यानाने आपल्या मॉडलिंग लाइफमध्ये अनेक मोठ्या ब्रांडसोबत काम केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा याना गुप्ताचे 7 निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...