आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवाला सोन्याच्या ताटात जेवू घालणार बप्पी लहिरी, गिफ्ट करणार 4 कोटींची कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द सिंगर बप्पी लहिरी 22 मार्चला आपल्या नातवाचे नामकरण करणार आहे. हा त्यांचा मुलगा बाप्पा लहिरीचा मुलगा आहे. त्याचा जन्म 4 ऑक्टोबर 2017 मध्ये अमेरिकेत झाला होता. त्याचा नामकरण सोहळा जुहू येथील एका रेसिडेंसमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात मनोरंजन जगतातील प्रसिध्द व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार आहे. आम्ही बप्पी लहिरी आणि त्यांचा मुलगा बाप्पा लहिरी यांच्यासोबत बातचित केली. ते काय म्हणाले हे आज जाणून घेऊया...


प्रश्न : नाव काय ठेवणार?
बप्पी :
आम्ही देवाला खुप मानतो. माझ्या गळ्यात जे सोने आहे, ते सर्वात पहिले हरे कृष्ण हरे रामचे आहे. माझा मुलगा बाप्पा लहिरीने स्वप्नात पाहिले होते की, घरात कृष्ण देव येत आहे. मग आम्ही ठरवले की, मुलाचे नाव किशेसचंद लहिरी ठेवणार. कारण माझ्या वडीलांचे नाव अपरेश लाहिडी होते. माझे खरे नाव अलिकेश(बप्पी) लहिरी आहे आणि माझ्या मुलाचे नाव अरुणेश(बाप्पा) लहिरी आहे. यामुळे त्याचे नाव किशेश लहिरी ठेवणार होते. परंतू माझी पत्नी चित्रा आणि मुलगा बाप्पाने त्याचे नाव कृष लहिरी असे फायनल केले.


बाप्पा : मी कृष्णाचा खुप मोठा भक्त आहे. मला असे वाटत होते की, मुलगा झाल्यावर त्याचे नाव किसना ठेवावे. परंतू हे नाव खुप मोठे होत होते. यामुळे याला शॉर्ट करुन 'कृष' असे ठेवले. हे इंग्रजीत लिहिताना त्याची स्पेलिंग KRISHH असेल. मुलाचा जन्म लॉस एंजलिसमध्ये झाला. त्यावेळी मी तिथे रेकॉर्डिंग करत होते.

 

प्रश्न : मुलाचे गिफ्ट काय असेल?
बप्पी :
सोने हे शुभ असते. यामुळे मी त्याला सोन्याच्या ताटात खीर खाऊ घालेल. घरात कृष्णाची खुप मोठी मुर्ती आहे. सर्व लोकांकडून आशिर्वाद मागतो.
बाप्पा : आमच्यासाठी सोने खुप लकी ठरते. मी मुलाला डायमंडचे पेंडल देईल. त्यावर कृष्ण नावाचे इनिशिअल म्हणजेच 'के' लिहिलेले असेल. कृषच्या फर्स्ट बर्थडेला डॅडीने बेंटले कार बुक केली आहे. ही चार महिन्यात येईल. याची किंमत 3-4 कोटी आहे.

 

प्रश्न : पाहुण्यांमध्ये कोण-कोण उपस्थित असेल?
बप्पी :
आशा भोसले यांनी माझ्या मुलाच्या नामकरणाच्या वेळी त्याला कडेवर घेतले होते. तेव्हा त्या येणार आहेत. बरेच लोक मुंबईत नाही. तीरीही जे असतील, ते सर्व येतील. बच्चन फॅमिली, कपूर फॅमिली, राकेश रोशन-पिंकी रोशन अशा अनेक लोकांना बोलावले आहे.
बाप्पा : माझे आणि डॅडीचे जवळचे मित्र येतील. यामध्ये शान, अल्का याज्ञनिक, इला अरुण, राकेश रोशन, म्यूझिक डायरेक्टर जतिन ललित, नेहा भसीन, रणधीर कपूर, जीतेंद्र आणि रणवीर सिंह येणार आहेत. हेमा मालिनी आणि बच्चन कुटूंबातून एश्वर्या राय बच्चन येऊ शकतात. कारण बच्चन कुटूंबात ऐश्वर्यात इथे आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बप्पी लहिरीच्या नातवाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...