आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत झाली श्रीदेवींची शोकसभा, मीत ब्रदर्सने दिले ट्रिब्युट, पती बोनी कपूर झाले सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन होऊन आता 15 दिवसांचा कालावधी लोटला आहे. अलीकडेच मीत ब्रदर्स यांनी मुंबईत त्यांच्यासाठी शोक सभेचे आयोजन केले होते. यावेळी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर शोकसभेत पोहोचले होते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर आणि त्यांची मुले अर्जुन कपूर, अंशुला यांच्यासोबतचे संबंध सुधारले आहे. अर्जुन आणि अंशुला त्यांच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशीसोबत एकत्र राहणार असल्याचेही वृत्त आहे. 


चेन्नईत झाली होती श्रीदेवींची प्रेअर मीट... 
- श्रीदेवी यांचे होमटाऊन असलेल्या चेन्नईत 11 मार्च रोजी प्रेअर मीटचे आयोजन करण्यात आले होते.
- यावेळी जान्हवी आणि खुशी अतिशय भावूक दिसल्या. साऊथ स्टार्स अजित त्यांच्या पत्नी शालिनीसोबत पोहोचले होते. याशिवाय सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका, एआर रहमान, कीर्ती यांनीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली.
- तर फॅमिली मेंबर्समध्ये बोनी कपूर, संजय कपूर, अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता कपूरसह कपूर कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमर सिंग यावेळी उपस्थित होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवी यांच्या प्रेअर मीटचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...