आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

के. एल. सहगल यांची 114 वी जयंती, गूगलने स्मरणार्थ बनवले डूडल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : अमेरिकेची टेक्नोलॉजी कंपनी गूगलने आज भारतीय सिनेमाचे अभिनेता आणि गायक राहिलेल्या कुंडललाल सेहगल यांच्या 114 व्या जन्मदिवशी नवीन डूडल बनवलेय. गूगलने डूडलच्या माध्यमातून के. एल. सहगल यांना आपल्या खास अंदाजात स्मरण केले. के एल सहगल हे आपल्या खास पध्दतीने गाणे गाण्यासाठी प्रसिध्द होते. त्यांचा आवाज लोकांना खुप आवडत होता. 

 

सुरुवातीचे जीवन
केअल सहजल यांचा 11 एप्रिल 1904 मध्ये जन्म झाला होता. जम्मू हे त्यांचे जन्म ठिकाण होते. बालपणीच त्यांनी आईसोबतच संगीत शिकले. ते आपल्या आईसोबत शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या भजन किर्तनांना जात होते. सहगल यांनी प्राथमिक शिक्षणानंतर लगेच शिक्षण सोडले होते. यानंतर ते मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर टाइमकीपरची नोकरी करायचे. नंतर ते मुरादाबादवरुन कानपुरला आले आणि येथे एका ठिकाणी नोकरी केली. सहगल यांनी कामपुरातच संगीत शिकले.


चित्रपटांचा प्रवास
केअल सहगल 1931-32 मध्ये चित्रपट जगतात आले आणि प्रसिध्द गायक व अभिनेता बनले. 1935 ते 1947 च्या काळात ते खुप प्रसिध्द झाले होते. त्यांनी जवळपास 36 चित्रपटात काम केले. यामध्ये 28 चित्रपट हे हिंदी होते. तर 7 चित्रपट हे बंगाली आणि एक तामिळ चित्रपट होता. आपल्या 15 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आठवणीत राहतील अशा भूमिका साकारल्या आणि सदैव स्मरणात राहतील असे गाणे गायले. प्रेसीडेंट, माय सिस्टर, जिंदगी, चांदीदास, भक्त सूरदास, तानसेन हे चित्रपट खुप हिट ठरले.

 

वयाच्या 43 वर्षी झाले निधन 
खुप जास्त दारुचे सेवन केल्यामुळे 1946 मध्ये ते खुप आजारी पडले. यानंतर ते जालंधरला गेले. येथे 18 जानेवारी 1947 मध्ये लिव्हरच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गूगल डूडल...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...