आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षाच्या सनी देओलसोबत दिसेल 27 वर्षाची ही अॅक्ट्रेस, फेमस हिरोइनची आहे बहिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगन स्टारर ‘दृश्यम’ फेम अॅट्रेस इशिता दत्ताची मोठी बहिन तनुश्री दत्ताचे ग्लॅमर इंडस्ट्रीसोबत कटू संबंध राहिले. असे असूनही इशिता ग्लॅमर आणि बॉलीवुडमध्ये जम बसवत आहे. गेल्या वर्षी ती कपिल शर्मासोबत 'फिरंगी'मध्ये दिसली होती. सध्या ती साउथ इंडस्ट्री आणि बॉलीवुडमध्ये संतुलन बनवून काम करत आहे. तिच्याशी केलेली चर्चा....

 

एका कलाकाराला त्याची फिल्म हिट झाल्याचा फायदा मिळतो. 'दृश्यम' चालल्याने तुझ्या करियरला किती फायदा झाला?
> मी तर आधी देखील काम केले होते, परंतु मला ‘दृश्यम’मुळे ओळख मिळाली. त्यातुनच लोकांना पटले की, इशिता देखील उत्तम अभिनेत्री आहे. आता मला कोणत्याही प्रकराच्या शो किंवा फिल्मसाठी ऑडिशन द्यावे लागत नाही.


त्यानंतर किती सिनेमांची ऑफर मिळाली, किती सिनेमांना तु नाही म्हणाली?
> अनेक ऑफर आल्या, अनेकांना नकार देखील दिला. ते यामुळे की यातील बहुतांश फिल्ममध्ये मला ‘दृश्यम’प्रमाणेच भूमिका देऊन टाइपकास्ट करण्यात येत होते. मला छोट्या मुलीचेच रोल मिळू लागले होते. त्या सर्वांना मी नकार दिला आणि चांगल्या फिल्मची वाट पाहिली. त्यानंतर मला 'फिरंगी'ची ऑफर मिळाली आणि आता सनी देओलसोबत काम करत आहे.


सनी देओल सोबतची फिल्म कधी सुरू केली होती?
>मी गेल्या काही दिवसात सुट्यांहून परतले आहे. त्याआधी मी हा प्रोजेक्ट पुर्ण केला होता. याच्या पुढील शुटिंग एक महिन्यात सुरू करेल असे वाटते. या फिल्ममध्ये सनी दोओल आहे आणि माझ्या अपोजिट करण कपाडिया आहे. या फिल्मसाठी मी खूप एक्साइटेड आहे. ते यामुळे की, यात मी पहिल्यांदा अॅक्शन करणार आहे. याशिवाय मला इतर प्रोजेक्टमध्ये देखील कामाची अपेक्षा आहे.


या फिल्मविषयी काय सांगशील?
>या फिल्मविषयी बोलने थोडे घाईचे होईल. मला फक्त एवढेच सांगायचे सांगण्यात आले आहे की, ही एक अॅक्शन फिल्म आहे. सनी देओस सर पुन्हा एकदा आपल्या अॅक्शन अवतारात येणार आहेत, दर्शकांना ते या रुपात नक्कीच आवडतील. ही फिल्म पुर्ण झाल्यानंतर आम्ही या फिल्मविषयी अधिक सविस्तरपणे बोलू शकू.


फिल्मध्ये अॅक्शन करण्यासाठी काय-काय प्रशिक्षण घेतले?
>या फिल्ममध्ये एकदम रिअल अॅक्शन आहे. यासाठी मला खूप सराव करावा लागला. एकदा जखमी देखील झाले होते.

 

तु एकसोबत अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आहेस, संतुलन बनवने जमते का?
>हो. मी इतर अॅक्ट्रेसप्रमाणे स्वत:ला केवळ एकाच माध्यामापुरते सीमित ठेवले नाही. मी सर्व काही करत राहिल, कारण हे सर्व करूनच मी आज या ठिकाणी पोहोचले आहे. हेच कारण आहे, की मी टीव्ही, डिजिटल, साउथ इंटस्ट्री आणि बॉलीवूडमध्ये संतुलन बनवून ठेवले आहे.


फिल्मचे टायटल ठरले का?
>नाही. परंतु, सध्या आम्ही याला ब्लँक नाव दिले आहे.  निर्मात्यांनी आद्याप याची अधिकृत घोषणा केली नाही. ती देखील लवकरच करण्यात येईल.

 

ही फिल्म कोणत्या जॉनरची फिल्म आहे?
>ही एक अॅक्शन जॉनरची फिल्म आहे. कोणत्याही सत्य कथेवर आधारीत नाही. ही माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक फिल्म आहे, कारण मी यापूर्वी कधीच अॅक्शन फिल्ममध्ये काम केले नव्हते. ही फिल्म माझ्यासाठी यामुळे देखील स्पेशल आहे, की मी सनी सर सोबत काम करत आहे.


तु कपिल शर्मासोबत काम केले आहे. त्याच्याप्रमाणे तु देखील छोट्या शहरातून आली आहेस. तो सध्या प्रसिद्ध कमी आणि बदनाम जास्त आहे. तु तुझे यश कसे डोक्यात जाऊ दिले नाही?
> माझा उद्देश दार्जात्मक काम करणे आणि प्रशंसा मिळवणे आहे. त्या प्रशंसांमुळे भारावून जाणे नाही. मी घरी पोहचल्यानंतर सामान्य इशिता असते. मला याचि अजिबात चिंता नसते की, मला ट्विटर, इंस्टाग्राम आदिंवर किती फॉलोवर्स फॉलो करतात.

बातम्या आणखी आहेत...