आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 वर्षानंतर माधुरीच्या 'एक दो तीन...' वर थिरकणार जॅकलीन, समोर आला टीजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जॅकलीन फर्नांडीज 'बागी 2' चित्रपटात माधुरी दीक्षितचे प्रसिध्द गाणे 'एक दो तीन...' वर थिरकताना दिसणार आहे. या गाण्याचा 25 सेकंदांचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला. यामध्ये जॅकलीन खुप बोल्ड लूकमध्ये दिसतेय. गाण्यात जॅकलीनचा गेटअप हा माधुरी सारखाच आहे. हे गाणे गणेश आचार्य आणि अहमद खानने कोरियोग्राफ केलेय. 

 

माधुरीसारखे दुसरे कुणी असू शकत नाही
- जॅकलीनने पहिलेच सांगितलेय की, माधुरीसारखे कुणीच असू शकत नाही. मी नशीबवान आहे की, मला गणेश आचार्य, अहमद खान आणि साजित नाडियादवालासोबत गाणे करण्याची संधी मिळाली.
- जॅकलीन म्हणाली की, मला माहिती होते की, मी कधीच माधुरी दीक्षितसोबत स्वतःची तुलना करु शकत नाही. कारण माधुरीसारखे दूसरे कुणीही नाही. बॉलिवूडमध्ये फक्त एकच माधुरी आहे आणि हे गाणे माझ्याकडून त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे. 


7 दिवसात सुरु झाले माधुरीचे गाणे...
- 'तेजाब'(1988) मध्ये माधुरीचे एक दो तीन... हे गाणे शूट करण्यासाठी 7 दिवस लागले होते. या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी सरोज खानला बेस्ट कोरियोग्राफरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
- यासोबतच या गाण्याची गायिका अलका याग्निकलाही बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, एक दो तीन...गाण्यातील जॅकलीन फर्नांडीजचा बोल्ड अंदाज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)