आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीची मुलगी जान्हवीने घेतला हा निर्णय, आईसाठी करतेय हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : श्रीदेवी आता या जगात नाहीत. परंतू आपल्या आईला अभिमान वाटावा यासाठी जान्हवीने एक निर्णय घेतलाय. जान्हवीने चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला. 'धडक' चित्रपटातून तिला आईला श्रध्दांजली देण्याची इच्छा आहे. यामुळेच जान्हवीने डायरेक्टर शशांस खेतान यांना सांगितले की, ती शूटिंगमधून ब्रेक घेणार नाही. चित्रपटाचे शूटिंग जे होते तेच राहणार आहे. तिला वाटते की, कोणत्याच कारणांमुळे चित्रपट थांबू नये. सूत्रांनुसार जान्हवी सेटवर आता पहिल्यापेक्षा जास्त मन लावून काम करतेय. 


जान्हवीला करायची आहे आईची इच्छा पुर्ण
जान्हवीला आई श्रीदेवीची इच्छा पुर्ण करायची आहे. मुलीला सिल्वर स्क्रीन पाहण्याची इच्छा श्रीदेवींना होती. त्यांची ही इच्छा पुर्ण करण्यासाठी जान्हवीला लवकरात लवकर शूटिंग करायची आहे. याच कारणामुळे ती आईच्या मृत्यूच्या 12 दिवसांनंतरच शूटिंगसाठी हजर झाली. हा चित्रपट 6 जुलैला रिलीज होणार आहे. जान्हवी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत स्क्रीन शेअर करतेय.


सेटवर मोबाइल फोन बॅन
'धडक' चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटचे काही फोटोज समोर आले होते. नुकता जान्हवी आणि ईशानचा एक व्हिडिओ लीक झालाहोता. या घटना बंद व्हाव्यात म्हणून प्रोड्यूसर करण जोहरने सेटवर मोबाइल बॅन केलाय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी आणि ईशानचे काही फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...