आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूमुळे अर्धवट राहिला श्रीदेवीचा हा चित्रपट, आता माधुरी दीक्षित करणार पुर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिचा अर्धवट राहिलेला चित्रपट माधुरी दीक्षित पुर्ण करेल. श्रीदेवी यांनी अभिषेक वर्मन यांचा 'शिद्दत' चित्रपट साइन केला होता. परंतू 24 फेब्रुवारीला त्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे हे प्रोजेक्ट अर्धवट राहिले. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर चर्चा सुरु झाल्या होत्या की, माधुरी दीक्षितला या चित्रपटासाठी कास्ट केले जाऊ शकते. आता जान्हवी कपूरने हे स्पष्ट केलेय. 


जान्हवीने मानले माधुरीचे आभार...
- जान्हवीने इंस्टाग्रामवर माधुरीसोबतचा आई श्रीदेवीचा एक फोटो शेअर केलाय.
- यासोबत तिने लिहिलेय की, "अभिषेक वर्मनचा आगामी चित्रपट आईच्या खुप जवळचा होता. पापा, खुशी आणि माझ्याकडून तुमचे खुप आभार, तुम्ही या चित्रपटाचा भाग बनल्या आहात."
- माधुरी दीक्षित शेवटच्या वेळी 'गुलाल' (2014) या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती 'धमाल' च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर ती 'शिद्दत' वर काम सुरु करेल.

 

तसे श्रीदेवींनी आपल्या करिअरच्या अनेक भूमिका नाकारल्या होत्या. यानंतर त्यांच्या भूमिका दूस-या अभिनेत्रींनी केल्या. पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अशाच काही चित्रपटांविषयी...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...