आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : 30 कोटींचे आहे कंगनाचे नवीन घर, कुटूंबासोबत केला गृहप्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड स्टार कंगना रनोटने मनालीमध्ये 30 कोटीं रुपयात एक घर खरेदी केले. नुकतीच कंगनाने घरात पूजा केली. यावेळी तिचे कुटूंबिय उपस्थित होते. सर्वांनी एकत्र गृहप्रवेश केला. कंगनाने 10 कोटींमध्ये ही जमीन खरेदी केली होती. यानंतर तिने येथे घर खरेदी केले. यासाठी 20 कोटींची गुंतवणूक करावी लागली.


लग्जरी बंगल्यात आहेत 8 बेडरुम
कंगनाच्या या लग्जरी बंगल्यात 8 बेडरुम आहेत. यासोबतच डायनिंग रुम, फायर प्लेस, जिम, वेगळी योगा रुमही आहे. हा बंगला विंटेज स्टाइलने तयार केलाय. कंगनाचे मुंबईतही 5 बेडरुमचे एक घर आहे. 


कंगनाचे फॅमिली बॅकग्राउंड
कंगनाचे वडील अमरदीप रनोट बिझनेसमन आहेत. आई आशा रनोट स्कूलमध्ये टीचर आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव रंगोली आहे. रंगोली, कंगनाची मॅनेजर आहे. रंगोलीला अॅसिड अटॅकचा सामना करावा लागला होता. रंगोलीच्या आयुष्यावर कंगनाला बायोपिक बनवण्याची इच्छा आहे. कंगनाचा एक लहान भाऊ आहे. ज्याचे नाव अक्षत रनोट आहे.

 

या चित्रपटांमध्ये केलेय काम
कंगनाचा जन्म 23 मार्च 1987 मध्ये झाला. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील सुरजपूरमध्ये तिचा जन्म झाला. 2006 मध्ये तिने 'गँगस्टर' चित्रपटातून चित्रपट करिअरची सुरुवात केली. यासोबतच तिने 'फैशन', 'वो लम्हें', 'लाइफ इन मेट्रो', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'तनु वेड्स मनु', 'क्वीन', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' सारखे सुपरहिट चित्रपट दिले. तिचे  'रिवॉल्वर रानी', 'नो प्रोब्लम', 'नॉक आउट', 'आई लव एन वाय', 'कट्टी-बट्टी', 'रंगून' सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कंगना कनोटच्या नवीन घराचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...