आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी ऑफिसरची मुलगी आहे इरफानची ही हिरोइन, 1st हिटनंतर नाकारले 30 चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इरफान खानसोबत 'लंचबॉक्स' आणि अक्षय कुमारसोबत 'एयरलिफ्ट' या चित्रपटात झळकलेली निमरत कौर 13 मार्चला 36 वर्षांची झाली. 1982 मध्ये राजस्थानच्या पिलानीमध्ये निमरतचा जन्म झाला. तिचे वडील इंडियन आर्मीमध्ये होते. 1994 मध्ये ते काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले. निमरतच्या लहान बहिणीचे नाव रुबीन आहे आणि ती एक सायकोलॉजिस्ट आहे. 'लंचबॉक्स' चित्रपटातून निरमतला मिळाली प्रसिध्दी...


- निमरतने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेतलेय. ती कॉलेजमध्ये नाटकांमध्ये भाग घ्यायची.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, निमरतने 'वन नाइट विद द किंग' नावाच्या इंग्रजी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2012 मध्ये ती 'पेडलर्स' मध्ये दिसली.
- 'लंचबॉक्स' हिट ठरल्यानंतर निमरतने जवळपास 27 ते 30 चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. नंतर तिला अक्षय कुमार स्टारर 'एयरलिफ्ट' चित्रपटात काम मिळाले.
- 'लंचबॉक्स' चित्रपटातून तिची प्रसिध्दी वाढली. यामध्ये ती इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत दिसली होती.


निमरतला मिळालेय अनेक पुरस्कार
- एका म्यूझिक व्हिडिओमधून निमरत सर्वात पहिले लाइमलाइटमध्ये आली. तिने कुमार सानू आणि श्रेया घोषालच्या गाण्यांमध्ये स्क्रीन अपीयरेंस दिला. यासोबतच 'कॅडबरी डेरी मिल्क' सारख्या जाहिरातींमध्येही ती झळकलेली आहे.
- निमरतला 2013 मध्ये अमजोनास फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यासोबतच 2014 मध्ये फ्रेश फेससाठी वॉग ब्यूटी अवॉर्ड, 2015 मध्ये चित्रपटातील तिच्या सहभागासाठी तिला GR8 वुमन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेय.
- निमरत दोन वेळा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. पहिल्यांदा ती 'पेडलर' चित्रपटासाठी सहभागी झाली तर दुस-यांदा 'लंचबॉक्स' साठी सहभागी झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा निमरतचे काही निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...