आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा यांचे अमिताभच्या सूनेला पत्र, लिहिले - तुला काहीच सिध्द करण्याची गरज नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : रेखा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्याने रेखाला आई म्हणून संबोधित केले होते. रेखाने नुकतेच एका मॅगझीनमध्ये ऐश्वर्यासाठी एक पत्र लिहिलेय. हे पत्र वाचून समजते की, रेखासाठी ऐश्वर्या किती महत्त्वाची आहे. 


रेखाने अशी केली पत्राची सुरुवात...
- रेखाने पत्राच्या सुरुवातीस लिहिले, 'माझी ऐश' तुझ्यासारखी महिला अशा नदीप्रमाणे असते, जी कोणत्याच बनावटीशिवाय पुढे चालत राहते. आणि आपल्या मार्गावर पोहोचताना आपली ओळख हरवू देत नाही. त्यांनी लिहिले की, तु जे काही म्हणालीये ते लोक विसरतील, तु काय केलेय तेही लोक विसरतील, परंतू तू त्यांना काय जाणिव करु दिली आहे, ते लोक कधीच विसरु शकणार नाहीत. तु एक जिवंत उदाहरण आहे. तुझ्यात पुढे जाण्याची हिंमत आणि सामर्थ्य आहे. तु नेहमीच नैतिकतेचे पालन केले आहेस.


- रेखा पुढे लिहितात की, "तु स्वतः पुर्ण आहेस, तुला काही सिध्द करण्याची गरज नाही. ऐश्वर्याला बाळं म्हणते रेखाने लिहिले की, तु खुप मोठा प्रवास पुर्ण केलाय. तुझ्यासमोर अनेक अडचणी आल्या परंतू हुशारीने त्या पार केल्या. मला तुझा किती अभिमान आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. मला तुझा संपुर्ण चेहरा आकर्षित करतो. तु तुझ्या सर्वच भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत. परंतू तुझी 'आई'ची भूमिका मला सर्वात चांगली वाटली. जी तु आराध्यासाठी निभावतेय. असाच आनंद वाटत राहा. माझ्या प्रार्थना आणि आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे. खुप सारे प्रेम तुझ्यासाठी, आयुष्यमान भवः रेखा मां"


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रेखा आणि ऐश्वर्या रायचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...