आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या हिरोइनकडे उपचारासाठी नाही पैसे, मागत आहे मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'वीरगति' चित्रपटातील हिरोइन पूजा डडवालाच्या आजाराच्या बातम्या सध्या येत आहेत. तिला टीबी आणि फुफ्फूसांसदर्भात आजार झालाय. पूजाची आर्थिक परिस्थिती खुप नाजूक आहे. यामुळे ती आपले उपचार करण्यास सक्षम नाही. पूजा गेल्या 15 दिवसांपासून मुबईच्या शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. 
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजाला गेल्या 6 महिन्यांपासून टीबीसाराखा गंभीर आजार झालाय. तिने मदतीसाठी सलमान खानशी संपर्क केला परंतू अजूनही काही बोलणे होऊ शकलेले नाही.
- पूजाचा व्हिडिओ पाहून ते मदत करतील अशी आशा पूजाला आहे. पूजा मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. 
- पूजाचे जवळचे लोक सांगतात की, तिच्या आजारामुळे तिचा नवरा आणि घरच्या लोकांनी तिला एकटे सोडले आहे. योग्य प्रकारे उपचार न झाल्यामुळे तिची तब्येत जास्तच बिघडत आहे. 
- पूजाने 'वीरगति' सोबतच 'हिन्दुस्तान' आणि 'सिन्दूर की सौगंध' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पूजाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)