आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदित नारायणच्या मुलाने ऑटोला मारली धडक, जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गायक उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायणने मुंबईच्या अंधेरीमध्ये आपल्या मर्सडीज कारने ऑटो रिक्शाला धडक दिली. यामुळे ऑटो चालक आणि यामधील एक महिला जखमी झाली. आदित्यने ट्रॅफिक नियमांकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी आदित्यचे मेडिकल टेस्ट केले आहेत. रविवारी दुपारी या घटनेविषयी आदित्यच्या विरोधात ट्रॅफिक नियम मोडल्या विरुध्द केस दाखल करुन त्याला अरेस्ट केले. नंतर 10 हजार रुपये भरुन त्याला जामिन देण्यात आला.

 

आयसीयूमध्ये आहे ऑटो ड्रायवर
- मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑटो ड्रायवरच्या डोक्याला जखम झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो आयसीयूमध्ये अॅडमिट आहे. ऑटोमधील महिला पॅसेंजरचा पाय फ्रॅक्चर झालाय.
- हा उपघात लोखंडवाला इंद्रलोक बिल्डिंगसमोर झाला. आदित्य स्पीडमध्ये गाडी चालवत होता. त्याने ऑटोला मागून धडक दिली असे सांगितले जात आहे.
- 30 वर्षांच्या आदित्यविरुध्द आयपीसी कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पहिले त्याला अरेस्ट करण्यात आले होते. 

 

यापुर्वीही दिली आहे धमकी
आदित्य गेल्या वर्षी रायपुरमध्ये एका एयरलाइन्सच्या कर्मचा-याला धमकी दिल्यामुळे चर्चेत आला होता. एयरलाइन्सच्या कर्मचा-याने त्याच्याकडून जास्तीचे सामान झाल्यामुळे पैसे जास्त घेतले होते, त्यामुळे त्याने असे केले होते. यापुर्वी 2011 मध्ये आदित्यने एका मुलीवर वाईट कमेंट केली होती, तेव्हा तिने त्याच्या कानाखाली मारली होती.


दिसला होता 'मासूम' चित्रपटात
आदित्य 1996 मध्ये 'मासूम' सोबतच अनेक चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून झळकला होता. 'शापित' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आदित्य दिर्घकाळापासून सिंगिंग रिअॅलिटी शो होस्ट करतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आदित्यचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...