आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TV Actor KK Goswami Facts: This Three Feet Bhojpuri Actor Interesting Marriage Story

या 3 फूटाच्या अॅक्टरला विकत घेण्यासाठी पोहोचले होते सर्कसवाले, दिली होती 50 हजाराची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीव्ही जगतात आपल्या अभिनयाची छाप सोडाणारा आणि अल्पावधीत ओळख निर्माण करणारा अभिनेता के के गोस्वामी (44) सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. 1997 मध्ये त्याने टीव्ही शो 'शक्तिमान'मधून डेब्यू केले होते. तो शेवटी 'त्रिदेवीयां'मध्ये दिसला. अतिशय कमी लोकांना माहिती आहे की, बिहारमधील एका छोट्या गावात जन्म झालेल्या गोस्वामीने मुंबईत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला. 


सर्कसवाले विकत घेण्यासाठी आले होते...
- गोस्वामीने स्वत: एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, त्याच्या छोटा भावाची उंची देखील छोटी आहे. याविषयी एका सर्कसवाल्याला कळाले तेव्हा तो वडिलांशी बोलण्यासाठी आला.
- सर्कसवाल्याने वडिलांना दोघांना विकत घेण्याचा विषय काढला. त्या बदल्यात त्याने वडिलांना 50 हजार रुपयांची ऑफर दिली होती. याला सर्कसचे काम सिकवू असे सांगितले.
- त्यावेळी गोस्वामीचे वय अवघे 10-12 वर्ष होते. त्याच्या वडिलांनी सर्कसवाल्याची ऑफर नाकारली आणि असे करण्यास साफ नकार दिला.

 

अशी आहे संघर्ष कथा
केके अॅक्टर बनण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. परंतू त्याला स्क्रीनपर्यंत पोहोचण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली. एकदा त्याला त्यांच्या सारखी हाइट असणा-या व्यक्तीने बियर बारमध्ये नोकरी करण्याची संधी दिली. तो बियर बारमध्ये गेला तर वॉचमनने त्याला डंडा मारुन पळवून लावले. याच क्षणाला केकेने अॅक्टर बनण्याचे ठरवले. स्ट्रगलच्या काळात केके आठवड्यातून फक्त एक दिवस जेवण करत होता आणि इतर 6 दिवस पाणी पिऊन झोपत होता. पैशांची तंगी असूनही त्याने हार मानली नाही आणि शेवटी त्याला यश मिळाले. त्याला 'शक्तिमान' ही टिव्ही सीरियल करण्याची संधी मिळाली. हा शो हिट झाला आणि केकेला ओळख मिळाली.


अनेक चित्रपटात केलेय काम
- गोस्वामी बिहार मुजफ्फरपुर जिल्ह्यातील राहणारा आहे. चित्रपटात येण्यापुर्वी तो गावात स्टूडिओ चालवत होता.
- नंतर छोट्या-छोट्या भूमिका भोजपुरी चित्रपटात केल्या. आतापर्यंत त्याने 250 चित्रपटात काम केलेय.
- गोस्वामीने अनेक प्रसिध्द सीरियल्समध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो लहानमुलांमध्ये खुप प्रसिध्द आहे.
- सध्या तो मुंबईमध्ये आपली दोन मुलं आणि पत्नीसोबत राहतो.


भीतीमुळे मंदिरात केले लग्न
- के.के. गोस्वामीची उंची कमी असतानाही त्यांच्या भावी पत्नीने होकार कळविला होता. नातेवाईक तिला समजावत होते की अजूनही वेळ आहे पुन्हा विचार कर. तूला चांगला मुलगा मिळेल, घाई करु नको. मात्र तिने ठामपणे सांगितले लग्न ठरले तेव्हाच मी त्यांना मनोमन पती मानले आहे आता दुसरा विचार नाही. ते बुटके असले म्हणून काय झाले, लग्न करणार तर केकेसोबतच. 

 

पुढील स्लाइडवर पाहा केके गोस्वामीचे आणखी काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...