आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्यामुळे पुन्हा शूट करावे लागले 'फन्ने खां'चे गाणे, बोल्ड शब्दांमुळे होती अडचण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या रायने सांगितल्यावर 'फन्ने खां'चे एक गाणे पुन्हा शूट करावे लागले. पहिले ऐश्वर्याने या गाण्याचे बोल बदलायला लावले. आता तिने हे पुर्ण गाणेच पुन्हा शूट करण्यास सांगितले आहे. फिल्ममेकर्ससंबंधीत एका सूत्राने सांगितले की, "पहिले या गाण्याचे टायटल 'फेव्हिकोल से' असे होते. यामध्ये काही बोल्ड शब्दांचा वापरही करण्यात आला होता. ऐश्वर्याला यावर डान्स करायचा होता. परंतू तिला गाण्यातील बोल्ड लिरिक्स आवडले नाही. तिने डायरेक्टर आणि प्रोड्यूसरला हे बदलण्यास सांगितले. मेकर्सने चित्रपटाची लीड अॅक्ट्रेसची मागणी मान्य केली आणि गाण्याचे बोल बदलले. नव्या गाण्याचे बोल हे 'हल्काहल्का सा खुमार' असे आहेत."


आता पुन्हा शूटिंग करण्याची मागणी
सूत्रांनुसार ऐश्वर्याला गाणे शूट करण्याची पध्दत आवडलेली नाही. सूत्रांनुसार, "कोरिओग्राफर आणि डायरेक्टर सेम पेजवर नव्हते. यामुळे दोन दिवस मेहनत घेऊनही हे गाणे योग्य प्रकारे शूट झाले नाही. यामुळे ऐश्वर्याने मेकर्स समोर आपली नाराजी व्यक्त केली. आता ते रिहर्सलनंतर या गाण्याची शूटिंग एक-दोन दिवसात पुन्हा करण्याच्या तयारीत आहेत."


3 ऑगस्टला रिलीज होणार चित्रपट 
- डायरेक्टर अतुल मांजरेकर यांनी या चित्रपटाचे डायरेक्शन केलेय. भूषण कुमार-राकेश ओमप्रकाश मेहरा हे या चित्रपटाचे प्रोडक्शन करत आहेत. हा म्यूझिकल-कॉमेडी चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये ऐश्वर्यासोबतच अनिल कपूर आणि राजकुमार राव यांचीही प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात ऐश्वर्या आणि अनिल तब्बल 18 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. दोघांनी यापुर्वी 'ताल'(1999) आणि 'हमारा दिल आपके पास है'(2000) मध्ये एकत्र काम केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...