आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer Out: 'फन्ने खां'च्या ट्रेलरमध्ये दिसली बाप-लेकीच्या स्वप्नपुर्तीची कथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायरेक्टर अतुल मांजरेकरचा आगामी चित्रपट 'फन्ने खां'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये बाप-लेकीच्या स्वप्नपुर्तीचा प्रवास पाहायला मिळतोय. चित्रपटातील फन्ने हा एक बँड वादक असतो. त्याची सर्व स्वप्न अपुर्ण राहतात. नंतर तो टॅक्सी ड्रायव्हर बनतो. आता त्याला आपल्या मुलीला मोठं करुन आपले स्वप्न पुर्ण करायचे असते. परंतू मुलीच्या लठ्ठपणामुळे लोक तिला पुढे जाऊ देत नाही. हाच सर्व प्रवास या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या राय, दिव्या दत्ता, राजकुमार राव, पिहू संद दिसत आहेत. 


अनिल कपूर यांनी ट्वीटवर शेअर केला टीजर...
अनिल कपूर यांनी चित्रपटाचा टीजर शेअर करत लिहिले की, Ek hai raaz aur dusra hai #FanneyKhan ka andaaz! Honge iske sapne poore? हा चित्रपट 2000 मध्ये आलेल्या बेल्जिअमच्या सटायरियल फिल्म 'Everybody's Famous' चा ऑफिशिअर रीमेक आहे.


3 ऑगस्टला रिलीज होणार चित्रपट
- हा चित्रपट 3 ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ऐश्वर्या राय चित्रपटात एका पॉप स्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी वृत्त होते की, ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे लिरिक्स ऐश्वर्याला आवडलेले नाही. यानंतर हे लिरिक्स बदलण्यात आले. ऐश्वर्याच्या गाण्याची शूटिंगही पुन्हा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...