आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये \'गर्लगँग\'सोबत करिश्मा कपूरने सेलिब्रेट केला वाढदिवस, समोर आले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करिश्मा कपूरने सोमवारी (25 जून) वयाचे 44 वर्षे पुर्ण केले. करिश्माच्या प्री-बर्थडे पार्टीचे फोटोज समोर आले आहेत. यामध्ये करिश्मा कपूर आपल्या 'गर्लगँग' म्हणजेच सोनम कपूर, नताशा पूनावाला आणि करीनासोबत एन्जॉय करताना दिसतेय. तर एका फोटोमध्यै सैफ अली खान आणि सोनमचा नवरा आनंद आहूजाही दिसत आहेत. सध्या करिश्मा आणि करीना, दोघी बहिणी कुटूंब आणि फ्रेंड्ससोबत लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत. विलू पूनावाला फाउंडेशनची चेअरपर्सन नताशा पूनावाला करिश्मा आणि करीनाची चांगली मैत्रीण आहे. 


करिश्माचा बॉयफ्रेंड संदीपही करु शकतो पार्टी जॉइन
वृत्तांनुसार करिश्माचा बॉयफ्रेंड संदीप तोषनीवालही तिची बर्थडेपार्टी जॉइन करु शकतो. करिश्मा आणि संदीप गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघंही अनेक वेळा एकत्र दिसले आहे. रिपोर्ट्सनुसार, संदीपने करिश्मासाठी मुंबईच्या जुहू परिसरात 3 BHK फ्लॅट खरेदी केला आहे. संदीप विवाहीत आहे आणि त्याने आपल्या पहिल्या पत्नीला मेंटल असल्याचे सांगत डायवोर्स फाइल केला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करिश्मा कपूरच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...