आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Katrina Kaif Birthday 16 Years Ago Bollywood Debut With Commercial Tv Ad Of Favicol

Bday spl: 16 वर्षे जुन्या या जाहिरातीतून कतरिना कैफने केला होता डेब्यू, पाहा व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बी टाउनची बार्बी गर्ल कतरीना कैफ आज (16 जुलै) 35 वा वाढदिवस साजरा करतेय. 'बूम' या बॉलिवूड चित्रपटातून तिने डेब्यू केला तेव्हापासून तर 'टायगर जिंदा है' चित्रपटापर्यंत तिचे लुक्स, हिंदी आणि अॅक्टिंगमध्ये कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. आज ती फिल्म मेकर्सची पहिली पसंत आहे, तरीही 16 वर्षांपुर्वी कतरीना आपला पोर्टफोलियो घेऊन प्रत्येक स्टूडिओमध्ये काम मागण्यासाठी जात होती. खुप प्रयत्नांनंतर कतरिनाला एक जाहिरात मिळाली होती. एका प्रसिध्द ब्रांडची ही जाहिरात होती.


फेविकोलचा विनोदी जाहिरात व्हिडिओ
चित्रपटांपुर्वी कतरिना एका जाहिरातीत दिसली होती. 2002 मधील ही जाहिरात एका स्पेशल सीरीजचा भाग होती. यामध्ये कतरिनाचा कोणताही डायलॉग नव्हता. कारण तिला हिन्दी येत नव्हती. जाहिरातीत कतरिना फक्त एक्सप्रेशन देताना दिसत होती.


- जाहिरातीत दाखवलेय की, ट्रेनमध्ये प्रवास करत असणा-या कतरिना समोर विवाहित जोडपे बसलेले असते. परंतू स्वप्नात तो समोरचा व्यक्ती कतरिनाच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो.
- एका जाहिरातीला 'मै निकला गड्डी लेके' या गदर चित्रपटातील गाणे बॅग्राउंडला आहे. 
- कतरिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने वयाच्या 14 व्या वर्षी एक ज्वेलरीची जाहिरात केली आहे.


'बूम' पुर्वी 'साया' चित्रपटांपुर्वी मिळाला होता
जुलै 2003 मध्ये रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या साया चित्रपटात पहिले कतरिना काम करणार होती. परंतू तिची हिन्दी चांगली नसल्यामुळे ती चित्रपट करु शकली नाही. नंतर कतरिनाची भूमिका तारा शर्माने साकारली. यानंतर लगेच तिला बूम हा चित्रपट मिळाला.
- मुकेश भट्टने कतरिनाला कॉफी शॉपमध्ये पाहिले होते. तिला पाहून त्यांनी फायनली कास्ट केले होते.

 

ईसाबेलही करणार बॉलीवूड डेब्यू
कतरिनाचे वडिल काश्मीरी आहेत तर आई सुजान ब्रिटिश आहे. ते 8 भावंड आहेत. 2018 मध्ये ती दोन चित्रपटात झळकणार आहे. आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' आणि शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात ती दिसणार आहे. 
- कॅटच्या कुटूंबात स्टीफन, क्रिस्टिन, नताशा, मेलिसा, सोनिया, ईसाबेल आणि भाऊ मायकलचा समावेश आहे.
- सलमानने कतरिनाची लहान बहीण ईसाबेलला लॉन्च करण्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...