Home | News | Sonakshi Sinhas Happy Phirr Bhaag Jayegi Trailer Released

Comedy ने भरपूर आहे 'हॅप्पी फिर भाग जाएगी'चा ट्रेलर, यावेळी आहेत दोन 'हॅप्पी'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 11:29 AM IST

2016 मध्ये रिलीज झालेल्या 'हॅप्पी भाग जाएगी'चा सीक्वल 'हॅप्पी फिर भाग जाएगी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

  • Sonakshi Sinhas Happy Phirr Bhaag Jayegi Trailer Released

    बॉलिवूड डेस्क: 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'हॅप्पी भाग जाएगी'चा सीक्वल 'हॅप्पी फिर भाग जाएगी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, डायना पेंटी, जिमी शेरगिल, जस्सी गिल, अली फजल आणि पीयूष मिश्रा प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. विशेष म्हणजे या सेकंड पार्टमध्ये एक नाही तर दोन हॅप्पी आहेत. पहिल्या पार्टमधील कथानक हे हॅप्पी पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या अवतीभोवती घुमत असते. सेकंड पार्टमध्ये हॅप्पी विदेशात पळून जाण्याची कथा सांगण्यात आली आहे.


    चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा झळकत आहे. तर डायना पेंटी ट्रेलरच्या शेवटी काही सेकेंड्स दिसते. 2.45 मिनिटांच्या या ट्रेलरच्या सुरुवातीस दाखवले जाते की, हॅपी बनलेल्या सोनाक्षीला एक चायनीज एजेंट किडनॅप करतो आणि चाइना येथे घेऊन जातो. परंतू सोनाक्षी खुप कंफ्यूजन निर्माण करते आणि त्याला म्हणते की, तु ज्या हॅप्पीला शोधत आहे ती हॅप्पी मी नाही. मग तुम्ही शोधत असलेली हॅप्पी कुठे आहे? यासाठी तुम्हाला चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहावी लागेल. चित्रपटात जिमी शेरगिल आणि अली फजलही प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

Trending