आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला गंभीर आजार आहे, 10 दिवसांत सर्व सांगतो, तोपर्यंत प्रार्थना करा, इरफान खानचे ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अॅक्टर इरफान खानने ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांने स्वतःला एक गंभीर आजार असल्याचे म्हटले आहे. मात्र नेमका आजार कोणता याबाबत त्याने काहीही सांगितलेले नाही. मात्र 10 दिवसांत सर्व काही स्पष्ट करणार असल्याचे इरफानने लिहिले आहे. तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा असे इरफानने ट्वीटमध्ये म्हटले आहे. इरफानने हिंदीबरोबरच ब्रिटिश आणि हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतही काम केले आहे. 


माझे आयुष्यच हादरले 
- एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी उठले आणि तुम्हाला तुमचे आयुष्यच हादरून गेले.. गेल्या 15 दिवसांपासून माझ्या जीवनात एक गूढ कथेप्रमाणे काही सुरू आहे. मला जेवढे समजू शकले आहे, त्यानुसार मी एका गंभीर आजाराशी लढा देत आहे. 
- मी जीवनात कधीही तडजोड केलेली नाही. मी नेहमीच माझ्या आवडीसाठी भांडत आलेलो आहे. भविष्यातही मी तसेच करेल. 
- माझे कुटुंब आणि माझे मित्र माझ्याबरोबर आहेत. आम्ही यातून चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. 
- सर्व टेस्ट होताच, मी आगामी दहा दिवसांत तुमच्याबरोबर बोलेल. 
- तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा. 


पद्मश्रीने सन्मानित.. 
- 7 जानेवारी, 1967 ला जयपूरमध्ये जन्मलेला इरफान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पासआऊट आहे. इरफास त्याच्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखला जातो. 
- 1988 मध्ये मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बेद्वारे त्याने चित्रपटांत डेब्यू केला. हा चित्रपट ऑस्कर साठीही नॉमिनेट झाला होता. 
- इरफानच्या काही खास चित्रपटांत हासिल, मकबूल, लाइफ इन मेट्रो, न्यूयॉर्क, द नेमसेक, लाइफ ऑफ पाय आणि पान सिंह तोमर यांचा समावेश आहे. 
- 2011 मध्ये त्याला पद्मश्रीने गौरवण्यात आले. 
- 2012 मध्ये पान सिंह तोमरसाठी त्याला बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 

पुढे वाचा, कावीळ झाल्याची होती चर्चा...

बातम्या आणखी आहेत...