आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदसौर रेप केसवर कोएना मित्राचे ट्वीट, गौहर खानची अशी होती रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मंदसौरमध्ये सात वर्षीय मुलीला पाठींबा देत अभिनेत्री कोइना मित्राने एक ट्वीट केले आहे. की, आता कोणता कँडल मार्च निघत नाहीये, कारण ही घटना एका हिंदू मुलीसोबत झाली आहे. एखाद्या मुस्लिम मुलीसोबत झाले असते, तर देशातील काही निवडक लोक रस्त्यांवर मेणबत्त्या घेऊन उतरले असते. कोइनाच्या या ट्वीटवर अभिनेत्री गौहर खान भडकली.


गौहरने कोइनाला उत्तर दिले

गौहर कोइनावर निशाना साधत बोलली की, "मला माहिती नव्हते की, तुला मुस्लिमांचा एवढा राहत आहे. एक मुसलमान असा अपराध करतो तर तो जिहादी असतो. परंतू एक हिंदू असा अपराध करतो तेव्हा तो केवळ हिंदू असतो. हैराण करणारे आहे..."


मालिनी अवस्थी झाली आहे ट्रोल
यापुर्वी लोकगायिका मालिनी अवस्थीने ट्वीट करुन म्हटले होते की,"कठुआ केसमध्ये लाज वाटली आणि मंदसौरमध्ये तोंडावर बंद झाले. आक्रोशामध्ये भेदभाव! बॉलिवूडमध्ये कुणी आता बोलत नाही, विदेशाच्या वृत्तपत्रांमध्येही आता भारताला बदनाम करणारे लेख लिहिले जात नाहीये, तासंतास याविषयावर बोलणारे अँकरही आता व्यथित दिसत आहेत. मुलींमध्ये फक्त सेक्युलर भेदभाव करु शकतात." जम्मूच्या कठूआमध्ये सात महिन्यांपुर्वी एका वर्षीच्या मुलीचा रेप करुन हत्या करण्यात आली होती.


मंदसौर रेप कांड काय?
मध्य प्रदेशातील मंदसौर येथील सरस्वती शिशुमंदिरात शिकणा-या 7 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. तिला शाळा सुटल्यानंतर गेटवरुन आरोपी इरफान हा लाडू खाऊ घालण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत घेऊन गेला. बुधवारी ती रक्तबंबाळ अवस्थेत झाडांमध्ये पडलेली मिळाली. इरफान आणि त्याच्या एका सोबत्याने तिच्यावर दुष्कृत्य केले. पोलिसांनी दोघांनाही अरेस्ट केले आहे. दूस-या आरोपीचे नाव आसिफ आहे.

 

मुलगी म्हणते मला बरे करा नाही तर मारुन टाका
सध्या एमवाय हॉस्पिटलमध्ये 10 डॉक्टरांची टीम मुलीची देखरेख करतेय. मुलीच्या जखमा खुप खोल आहेत. या भरुन निघण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा काळ लागेल. मुलीला खुप वेदना होत आहेत. तिच्या वेगवेगळ्या सर्जरी केल्या जात आहेत. ती म्हणतेय की, मला ठिक करा किंवा मारुन टाका.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...