आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एक व्हिलेन\'चा सीक्वेल येणार, सिध्दार्थ मल्होत्रासोबत दिसणार कृती सेनन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एकता कपूर, करण जोहरसोबत मिळून एक व्हिलेनचा सीक्वल बनवू शकते. एकताने 2014 मध्ये 'एक व्हिलेन' बनवला होता. चित्रपटातने बॉक्सऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. चित्रपटाच्या सीक्वलवर काम सुरु झाले असल्याचे वृत्त आहे. या सीक्वलसाठी एकता कपूर आणि करण जौहरने मिळून हात मिळवला. करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाची स्टारकास्ट अजून फायनल केलेली नाही. परंतू सिध्दार्थच्या नावाची चर्चा आहे. चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये फ्लोरवर येईल. यामध्ये सिध्दार्थसोबत कृती सेनन दिसू शकते. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहेत.


बॉलिवूडच्या अन्य काही बातम्या...


'संजू' चित्रपटातून खुप काही शिकलो : विक्की कौशल
विक्की कौशलची 'राजी' आणि 'लव्ह पर स्क्वायर फूट' सारख्या चित्रपटांसाठी खुप प्रशंसा झाली. आता 'संजू' चित्रपटातून त्याने पुन्हा एकता त्याचा तगडा अभिनय सर्वांना दाखवला आहे. विक्की कौशलने रविवारी ट्वीट केले की, 'मी खुप आनंदी आणि धन्य आहे. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद! या चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत काम केल्याने स्वतः खुप नशिबान असल्याची जाणिव होतेय. या चित्रपटातून मी एक कलाकार म्हणून शिकलोच, परंतू एक माणुस म्हणूनही खुप काही शिकलो.' राजकुमार हिरानींचा 'संजू' हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारित आहे. रणबीर कपूर चित्रपटात संजय दत्तच्या दिसतोय.


2. 'हाउसफुल-4' साठी किर्ती खरबंदा शिकते पोल डान्स
सध्या किर्ती खरबंदा पोल डान्सची ट्रेनिंग घेत आहे. एवढेच नाही तर ती स्वतःची फेक्सबिलिटी वाढवण्यासाठी एक महिन्याची डायटिंग फॉलो करतेय. किर्ती ही मेहनत 'हाउसफुल-4' चित्रपटातील भूमिकेसाठी करतेय. ती म्हणते की, 'फिटनेस मेंटेन करण्यासाठी पोल डान्स एक चांगली पध्दत आहे. हे मी पहिले कधीच केलेले नाही. आता हे शिकताना खुप एन्जॉय करतेय.' साजिद नाडियादवाला निर्मित हाउसफुल-4 चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेस देशमुख प्रमुख भूमिकेत असणार आहेत. तर दिग्दर्शन साजित खान करतील.

 

बातम्या आणखी आहेत...