आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : 'संजू' चित्रपटाने तीन दिवसा 120 कोटींचा गल्ला जमवला आहे. परंतू रिलीजच्या काही तासांच्या आतच हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाला होता. फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअपवर चित्रपटाची पायरेटेड कॉपी व्हायरल झाला होती. शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला. राजकुमार हिरानी हे या चित्रपटाची डायरेक्टर आहेत. संजय दत्तच्या आयुष्यावर तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत दिसला आहे. चित्रपट लीक होताच हिरानी आणि रणबीर कपूरच्या फॅन्सने लोकांना पारेटेड कॉपी न पाहण्याची अपील केली. परंतू याचा काही परिणाम दिसला नाही. आता पायरेसीपासून बचाव करण्यासाठी मेकर्सने पाच सदस्यांची टीम बनवली आहे.
हे काम करणार स्पेशल टीम
एका वेबसाइनुसार, चित्रपटाच्या डिस्ट्रीब्यूटर 'फॉक्स स्टार स्टूडियो कंपनी'ने एक स्पेशल टीम बनवली आहे. ही टीम ऑनलाइन पायरेटेड कॉपी सर्कुलेट होण्यावर नजर ठेवेल आणि तात्काळ ते डिलीट करेल. यासोबतच हा चित्रपट सर्वात पहिले कुठे लीक झाला, याची माहिती टीमला काढण्यास सांगितले आहे. यासोबतच राजकुमार हिरानी आणि प्रोड्यूसर विधु विनोद चोप्राने सायपर क्राम सेलमध्ये पहिलेच तक्रार केली आहे. सायबर टीमही चित्रपटाच्या पाच सदस्यीय टीमची मदत करतेय. त्यांना ऑनलाइनवर सर्व पायरेटेड लिंक्स डिलीट करायच्या आहेत. सोमवारपर्यंत चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीज व्हायरल होणे बंद झाले नाही तर सायबर क्राइम सेल प्रॉपर इन्वेस्टीगेशन करेल.
मक्कामधून लीक झाला होता चित्रपट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट सर्वात पहिले सऊदी अरबच्या मक्कामध्ये राहणा-या प्रि रिजवानने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला. रिजवना उम उल-करा यूनिव्हर्सिटीमध्ये काम करतो. हा चित्रपट शनिवारी फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला. तोपर्यंत याची पायरेटेड कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लीक चित्रपट 2 तास 28 मिनिटांचा आहे. रिजवानच्या पोस्टला शनिवारी दुपारपर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते.
पायरेसीविषयी भारतात कोणता कायदा :
ऑनलाइन पायरेसी वाढत असल्याचे पाहून भारत सरकारने ऑगस्ट 2016 वर बॅन लावण्यासाठी नवीन कायदा बनवला. यानुसार ऑनलाइन पायरेसी करणा-या 100 पेक्षा जास्त वेबसाइट बॅन करण्यात आल्या. यानुसार जो व्यक्ती ऑनलाइन पायरेटेड कंटेट पाहील त्याला कॉपीराइट अॅक्ट-1957 नुसार कलम 63, 63 आणि 65 ए नुसार दोषी ठरवले जाते. यासाठी 3 वर्षे कैद आणि 3 लाख रुपये दंड देण्याची शिक्षा देण्यात येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.