आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google Doodle:वयाच्या 13 व्या वर्षी शोषणानंतर सुरु झाली होती संगीत यात्रा, कोण होत्या गौहर जान?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : भारताची पहिली रेकॉर्डिंग सुपरस्टार गौहर जान यांची आज 145 वी जयंती आहे. या निमित्ताने गूगलने डूडल बनवून त्यांना ट्रिब्यूट दिले आहे. भारतीय सिनेमांची प्रसिध्द गायिका गौहर यांचा जन्म 26 जून 1983 ला झाला. त्यांचे खरे नाव एंजलिना योवर्ड होते. भारतीय संगीताच्या इतिहासात आपले गाणे रेकॉर्ड करणा-या त्या पहिल्या गायिका होत्या. याच कारणांमुळे त्यांना भारताच्या पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टारचा दर्जा मिळाला आहे. 


वयाच्या 13 वर्षी शोषण 
भारतीय शास्त्रीय संगीताला यशाच्या शिखरावर पोहोचवणा-या गौहर ख-या आयुष्यात शोषणाला बळी पडल्या होत्या. गौहर यांच्यावर वयाच्या 13 वर्षी बलात्कार झाला होता. या धक्क्यातून सावरुन गौहर यांनी संगीत जगतात आपले स्थान निर्माण केले. 1900 च्या सुरुवातीच्या दशकातील महिलांचे शोषण, फसवणूक आणि संघर्ष अशी गौहर यांची कथा आहे. गौहर यांच्या कथेला विक्रम संपथ यांनी अनेक वर्षे रिसर्च केल्यानंतर 'माय नेम इज गौहर जान' च्या माध्यमातून लोकांसमोर ठेवले. 


600 पेक्षा जास्त गाणे केले रेकॉर्ड
गौहर जान यांनी 20 भाषांमध्ये ठुमरीपासून ते भजनपर्यंत अनेक गाणे गायले. त्यांनी जवळपास 600 गाणे रेकॉर्ड केले होते. एवढेच नाही तर गौहर जान या पहिल्या गायिका होत्या ज्यांचे गाणे ग्रामाफोन कंपनीने रेकॉर्ड केले. 1902 ते 1920 च्या काळात 'द ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया' ने गौहरचे हिन्दुस्तानी, बांग्ला, गुजराती, मराठी, तमिल, अरबी, फारसी, पश्तो, अंग्रेजी आणि फ्रेंच गीतांचे सहाशे डिस्क काढले होते. त्यांचा खुप दबदबा होता. त्यांना कार्यक्रम आणि संगीत सभांमध्ये बोलावणे प्रतिष्ठेचे मानले जात होते.

 

बातम्या आणखी आहेत...