आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बागी 2' चित्रपटातील नवीन गाणे एक दो तीन... रिलीज झाले आहे. गाण्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस माधुरी दीक्षितचे प्रसिद्ध गाणे 'एक दो तीन...'च्या रिमिक्स व्हर्जनमध्ये डान्स करत आहे. यासोबतच या गाण्यात जॅकलिन ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. गाण्यामध्ये जॅकलिनचे गेटअप माधुरीच्या गेटअपशी मिळते-जुळते आहे. हे गाणे गणेश आचार्य आणि अहमद खानने कोरिओग्राफ केले आहे.
माधुरीसारखे दुसरे कोणीही होऊ शकत नाही...
- काही दिवसांपूर्वी जॅकलिनने सांगितले होते की, माधुरीसारखे दुसरे कोणीही होऊ शकत नाही. मी नशीबवान आहे की मला गणेश आचार्य, अहमद खान आणि साजिद नाडियादवाला यांच्यासोबत हे गाणे करण्याची संधी मिळाली.
- जॅकलिनने सांगितले की, मला हे माहिती आहे माधुरीसोबत कोणीही तुलना करू शकत नाही, कारण माधुरीसारखे दुसरे कोणीही बनू शकत नाही. बॉलिवूडमध्ये फक्त एकच माधुरी आहे आणि हे गाणे मी त्यांना डेडिकेट करते.
7 दिवसात शूट झाले होते माधुरीचे गाणे
- चित्रपट 'तेजाब' (1988) मध्ये माधुरीचे एक दो तीन...गाणे शूट करण्यासाठी सात दिवस लागले होते. या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी सरोज खान यांना बेस्ट कोरिओग्राफरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
- एवढेच नाही तर हे गाणे गाणारी गायिका अलका याग्निक यांना बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
पुढील स्लाईड्सवर पाहा, जॅकलिन फर्नांडिसचा गाण्यातील बोल्ड अंदाज आणि नवीन गाणे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.