आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Janhvi And Khushi Kapoor First Time Attend Step Brother Arjun Kapoor Birthday Party

B'day: जान्हवीने सावत्र भावासाठी इंस्टाग्रामवर लिहिला हा खास मॅसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर 33 वर्षांचा झाला आहे. त्याने मंगळवारी रात्री कुटूंबासोबत आपला वाढदिवस साजरा केला. पहिल्यांदाच त्याची सावत्र बहीण जान्हवी आणि खुशी त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या. या दोघी पापा बोनी कपूरसोबत अर्जुनच्या घरी पोहोचल्या. दोघी बहिणी फॉर्मल लूकमध्ये होत्या. जान्हवीने जीन्स-टी-शर्ट घातले होते. तर खुशी शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसली. जान्हवीने आपला भाऊ अर्जुन कपूरला इंस्टाग्रामवरही बर्थडे विश केले. तिने दोघी बहिणी म्हणजेच खुशी आणि अंशुलासोबतच अर्जुन कपूरचा फोटो शेअर करुन लिहिले की, 'तुम्ही आमची ताकद आहात, हॅपी बर्थडे अर्जुन भैया'...

 

अर्जुनची बहीण अंशुलाने भावासोबतच आपला बालपणीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोवर तिने पोस्ट करत लिहिले की, 'Happy birthday Bhai ❤️ You are genuinely the kindest, most hardworking, strongest & funniest person I know, with the biggest heart. You’ve always been our “protector” & my anchor in more ways than one - my steadfast support, my shelter from the storm, my strength & my emotional cornerstone. I will always be grateful that you’ve been with me through it all, making sure we are strong enough to withstand anything & that we will always come out on the other side unscathed. Always continue marching to your own beat, because we wouldn’t have you be any other way❣️love you to infinity @arjunkapoor 😘💥💯'.

 

श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जून कपूर आपल्या सावत्र बहिणी खुशी आणि जान्हवी कपूरच्या जवळ आला. यापुर्वी हे एकमेकांना पाहतही नव्हते. त्याने मुलाखतीत म्हटले होते की, जान्हवी आणि खुशी माझ्या बहिणी नाहीत. त्याचे खुशी आणि जान्हवीसोबत कोणतेच नाते नाही. आम्ही जास्त भेटत नाही आणि वेळही घालवत नाही. या नात्याला महत्त्व नाही. एवढेच नाही तर त्याला श्रीदेवी आवडत नव्हत्या. तो म्हणाला होता की, श्रीदेवी फक्त माझ्या वडिलांची बायको आहेत. अर्जुन हा बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूरचा मुलगा आहे. अर्जुनला एक बहिण आहे तिचे नाव अंशुला आहे. जून, 1996 मध्ये बोनीने दूसरे लग्न केले होते. यामुळे अर्जुन कपूरच्या आई मोना कपूर खुप दुखावल्या होत्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्जुन कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...