आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywood Update:\'लुका छुपी\' मधून भेटीला येणार कार्तिक-कृतीची रोमँटिक केमेस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'लुका छुपी' हा आगामी चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटातून कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटातून कार्तिक आर्यनने आपल्या अभिनायाची झकल प्रेक्षकांना दाखवली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करणार आहेत. तर दिनेश विजन यांची निर्मिती आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली. 

 

चित्रपट कधी येणार भेटीला
कार्तिक आर्यन या चित्रपटात एका स्थानिक न्यूज चॅनलच्या रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला 'मथुरा लाइव्ह' असे ठेवण्यात येणार होते. परंतू नंतर हे नाव बदलून 'लुका छुपी' असे ठेवण्यात आले. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अशी माहिती दिली.  कार्तिक आणि क्रिती ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटांमध्ये कार्तिकने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून दादही दिली होती. 
यांसारख्या चित्रपटांमधून कार्तिकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. क्रिती सनॉनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तिने नुकतंच ‘अर्जुन पटियाला’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये 'लुका छुपी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...