आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असे दिसताहेत 'मालगुडी डेज' चे छोटे स्वामी, अॅक्टिंग सोडून करत आहेत हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सन 1987 मध्ये आजच्याच दिवशी टिव्ही शो 'मालगुडी डेज' सुरु झाला होता. वयाच्या तिस-या वर्षी अभिनयाची सुरुवात करणारे मास्टर मंजुनाथ नायाकर यांनी 'मालगुडी डेज' चे स्वामी बनून आपली एक खास ओळख निर्माण केली होती, पण त्यावेळचा हा छोटा मुलगा आत्ता 41 वर्षांचा झाला आहे. आता अॅक्टिंग सोडून हा जाॅब करतात मंजुनाथ.... 

 

-'मालगुडी डेज' चा व्हर्जन असलेला चित्रपट 'स्वामी अॅंड फ्रेंडस' मध्ये त्यांनी मुख्य भुमिका केली होती. एवढेच नाही तर स्वामींनी 68 हिंदी आणि कन्नड चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी 1990मध्ये रिलीज झालेलया 'अग्निपथ' या चित्रपटात तरुण विजय दिनानाथ चोहानची भुमिका केली होती. 
-मंजुनाथ यांनी वयाच्या 19व्या वर्षी अभिनय सोडून दिला आणि पुढे आपले शिक्षण पूर्ण करण्यास सुरवात केली. त्यांन म्हैसूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात बीए आणि बॅंगलोर विद्यापीठी सोशिआलाॅतमध्ये एम. ए चे शिक्षण पूर्ण केले.
-यानंतर त्यांनी सिनेमेटोग्राफीचा डिप्लोमा देखील पूर्ण केला. आता ते नंदी इंफ्रास्ट्रक्चर काॅरिडाॅर इंटरप्राइझेससाठी काम करतात आणि बॅंगलुरुमध्ये स्वत:ची एक पीआर कंसल्टंसी देखील चालवतात. 
-मंजुनाथ यांचे स्वर्णरेखा नावाच्या मुलीबरोबर लग्न झाले आता त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पहा मास्टर मंजुनाथ नायाकार यांचे निवडक PHOTOS.....

बातम्या आणखी आहेत...