आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप केसमुळे होऊ शकले नाही मिथुन चक्रवर्तीच्‍या मुलाचे लग्न, हॉटेल सोडून गेले नवरीचे कुटूंब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई : बलात्कार आणि धमकीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती उर्फ मिमोह याचे लग्न पोलिस टीम पोहोचल्यामुळे कॅन्सल झाले. मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह आणि साउथ अभिनेत्री मदालसा शर्मा यांच्या लग्नाचे विधी शनिवारी ऊटी येथील हॉटेलमध्ये होणार होत्या. एका पोलिस ऑफिसरने सांगितले की, मिमोह आणि त्याची आई योगिता बाली यांच्यासोबत आरोपांविषयी विचारपुस करण्यात आली. यानंतर नवरीचे कुटूंबीय हॉटेल सोडून निघून गेले. 6 जुलै रोजी रेप केसविषयी मदालसाच्या आईला विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सांगितले की, ठरलेल्या वेळेवर लग्न होईल. त्यांनी सांगितले की, आरोप लावणा-या अभिनेत्रीविषयी आम्हाला पहिलेच माहिती होती. ती लग्नात अडचणी उभ्या करणार हेही माहिती होती. ऐनवेळी लग्न रद्द झाल्यामुळे सर्वांनाच धक्का देणार आहे. विशेष म्हणजे मिमोहची होणारी बायको मदालसाने या विषयावर सस्पेंस ठेवला. तिला या संपुर्ण प्रकरणाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. परंतू तिने काहीही बोलण्यास नकार दिला.

 

- एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सोमवारी मिमोहवर बलात्कार आणि गर्भपात करणे, फसुवणूक आणि योगिता बाली विरुध्द धमकीप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला. शनिवारी दिल्लीच्या कोर्टाने दोन्ही आरोपींना जामिन दिला होता. यापुर्वी आरोपींनी अटक स्थगित करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये अर्ज दाखल केला होता. परंतू कोर्टाने नकार दिला. 


मिमोहच्या वकीलांनी सांगितले की, लिव्ह-इन रिलेशनशीप संपल्यानंतरचे प्रकरण 
- मिमोहला शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या रोहिणी कोर्टातून अँटिसिपेटरी बेल मिळाली होती. यावेळी त्याची वकिल प्रियांका कृपाशंकर दुबेने सांगितले की, तक्रारदार तरुणीने केलेले आरोप उटल ठरले आहे. प्रियांकाने सांगितले की, "संपुर्ण प्रकरण हे सिंपल लिव्ह इन रिलेशनशीपचे होते. त्यांचे लग्न झाले नाही तर रिलेशनशीप संपल्याच्या दोन वर्षांनंतर माझ्या क्लाइंटला त्रास देण्यात आला. WhatsApp मॅसेजमध्ये त्यांनी दोघांनी मूव्ह ऑन होण्याचे मॅसेज केले होते. याच्या दोन वर्षांनंतर जूनमध्ये तक्रारदाराने माझ्या क्लाइंटवर विश्वासघाताचे आरोप लावले."
- "तक्रारदाराने 313 कलमेचा दाखला देत अबॉर्शन केल्याचे आरोप लावले. हे दोन तीन वर्षांपुर्वी झाले होते. तर मग त्यावेळी कंप्लेन का केली नाही. दूसरे म्हणजे मिमोहने तिचा रेप केला तर मग त्याच्यासोबत तीन वर्षे रिलेशनशीपमध्ये का राहिली? एवढे सर्व झाल्यानंतर तक्रारदारला मिमोहसोबत लग्न का करायचे होते? प्रियांकानुसार तक्रारदारही मिमोहला लग्न न करण्याच्या दमक्या देत होती."


-पीडितेच्या वकिलाने सांगितले की, - दिल्ली हाय कोर्टात करणार अपील
पीडितेचे वकिल नीरज गुप्ताने सांगितले की, ते निर्णयाची कॉपी वाचत आहेत. यानंतर सोमवारी दिल्ली हाय कोर्टात अपील करण्यात येईल.

 

बातम्या आणखी आहेत...